घरताज्या घडामोडीMehul Choksi : मेहुल चोक्सीच्या अडचणीत भर; सीबीआयकडून नवीन गुन्हा दाखल

Mehul Choksi : मेहुल चोक्सीच्या अडचणीत भर; सीबीआयकडून नवीन गुन्हा दाखल

Subscribe

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील हिरे व्यापारी आरोपी मेहुल चोक्सीच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सीबीआयने चोक्सी आणि त्याची कंपनी गितांजली जेम्सविरोधात नव्यानं गुन्हा दाखल केला आहे. इंडस्ट्रिअल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या फसवणूक प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेहुल चोक्सी आणि गितांजली जेम्सविरोधात IFCIचे एजीएम यांनी तक्रार दाखल केली होती, असं सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. परंतु प्राथमिक चौकशीनंतर चोक्सी आणि त्याच्या कंपनीविरोधात फसवणूकीच्या उद्देशाने बनावट सही ४६८ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आल्याचे सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

सन २०१४ ते २०१८ या काळात चोक्सीने २५ कोटी रूपयांचं कर्ज घेतलं आहे. पण कालांतराने चोक्सीकडून कर्जाची परतफेड होत नव्हती. यामध्ये बँकेशी केलेल्या कराराचं पालन चौक्सीकडून होत नसल्याचं दिसून आल्यामुळे चोक्सीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे तक्रारदार FCI च्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

- Advertisement -

दरम्यान, मेहुल चोक्सी रिटेल ज्वेलरी कंपनी गीतांजली ग्रुपचा मालक आहे. तसेच तो नीरव मोदीचा काकाही आहे. या दोघांवर पंजाब नॅशनल बँकेची १३,५०० कोटी रूपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. चोक्सी आणि नीरव मोदी जानेवारी २०१८ मध्ये भारतातून पळून गेले होते. फेब्रुवारीमध्ये सीबीआयने या कथित घोटाळ्याचा तपास सुरू केला होता.


हेही वाचा : Muzaffarnagar Durgs Case : मुझफ्फरनगरमध्ये ९०० कोटींचे ड्रग्ज जप्त, शाहीन बागमधून अटक झालेल्या हैदरशी कनेक्शन काय?


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -