घरताज्या घडामोडीराणा दाम्पत्याला पुढील २ दिवस तुरुंगातच काढावे लागणार, जामीन अर्जावर बुधवारी निर्णय...

राणा दाम्पत्याला पुढील २ दिवस तुरुंगातच काढावे लागणार, जामीन अर्जावर बुधवारी निर्णय येणार

Subscribe

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना पुढील दोन दिवस कोठडीतच काढावे लागणार आहेत. न्यायालयात निकालाचं वाचन पूर्ण न झाल्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. बुधवारी या प्रकरणावर सुनावणी होणार असून निर्णय देण्यात येणार आहे. वेळे अभावी न्यायालयाला आज निर्णय देता आला नाही. तसेच उद्या ईदमुळे न्यालयाच्या कामकाजाला सुट्टी आहे. त्यामुळे पुढील सुनावणी बुधवारी होणार आहे. सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी राणा दाम्पत्यावर कारवाई केली असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा राणा दाम्पत्याने दिला होता. सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी खार पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली होती. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून रवी राणा तळोजा कारागृहात तर नवनीत राणा अर्थररोड कारागृहात आहेत. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली होती. न्यायालयात अंतिम निर्णयाचे वाचन सुरु होते. परंतु कामकाजाची वेळ संपल्यामुळे निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. यामुळे पुढील २ दिवस राणा दाम्पत्यांना तुरुंगातच राहावे लागणार आहे.

- Advertisement -

खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याच्या भूमिकेवरुन माघार घेतल्याची घोषणा केली होती. परंतु या पूर्वीच दोन दिवसांपासून मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली होती. शेकडो शिवसैनिक रस्त्यावर आले होते. तसेच सामाजिक तेढ निर्माण केल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केल्यानंतर त्यांच्यावर १२४ ए अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई पोलीस अॅक्ट १३५ या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलनात थेट मुख्यमंत्री आणि राज्याच्या व्यवस्थेला आव्हान दिले होते. सरकारच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.

राणा दाम्पत्याला दंडाधिकारी न्यायालयाने  १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली होती. जामीन अर्जावरील सुनावणी झाली तेव्हा राणा दाम्पत्याच्या वकिलांनी जामीन देण्याची मागणी केली. दोन्ही आरोपी लोकप्रतिनिधी आहेत. आमदार खासदार आहेत त्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टीची जाणीव होती. सामाजिक तेढ निर्माण करण्याचा त्यांचा हेतू नव्हता त्यामुळे त्यांना जामीन देण्यात यावा अशी मागणी राणांच्या वकिलांनी केली होती. परंतु सराकरी वकील प्रदीप घरत यांनी जामीन देण्यास विरोध केला होता.

- Advertisement -

हेही वाचा : जेलमध्ये नवाब मलिकांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी जे.जे रुग्णालयात दाखल

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -