CBSE बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द, पंतप्रधानाच्या बैठकीत मोठा निर्णय

विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे त्यात कोणताही तडजोड केली जाणार नाही.

HSC Result 2021: 4789 students failed in this year's 12th standard examination

गेली अनेक दिवस बारावीच्या परीक्षांविषयी विद्यार्थी आणि पालकांच्या मनात चिंता होती. मात्र ती चिंता आता संपली आहे. कारण देशातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा महत्वाचा निर्णय आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. (CBSE board Class XII exams canceled, big decision in PM meeting)  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बारावी बोर्डाच्या परीक्षांवर झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेपेक्षा विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली विविध राज्यातील भागधारकांसोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर पंतप्रधान मोदी यांनी बारावी परीक्षेसंदर्भात हा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता CBSE आणि देशातील इतर बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा होणार नाहीत यावर शिक्का मोर्तब झाला आहे. गेली अनेक दिवस अनेक राज्य बारावीच्या परीक्षा न घेण्यावर ठाम होते. राज्यसरकार देखील अनेक दिवसांपासून या निर्णयाची वाट पाहत होते. केंद्राच्या निर्णयानंतर आता राज्यातही असे निर्णय घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्रासोबतच अनेक राज्यांनी बारावीच्या परीक्षा रद्द कराव्यात अशी मागणी केली होती.

CBSE बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय हा विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेण्यात आला आहे. कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर फार मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक तसेच शिक्षकांमध्येही परीक्षेसंदर्भात प्रचंड चिंता होती. मात्र त्यांची चिंता आता मिटली आहे,असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे आम्हाला विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे त्यात कोणताही तडजोड केली जाणार नाही. त्यामुळे परीक्षांसाठी विद्यार्थ्यांचे आयुष्य धोक्यात आणू शकत नाही, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.

सर्व भारधारकांनी विद्यार्थ्यांबाबत संवेदनशीलता दाखवण्याची गरज आहे. त्यामुळे योग्य आणि कालबद्ध पद्धतीने निकाल निश्चित करण्यात आले पाहिजेत अशा सूचना पंतप्रधान मोदींनी दिल्या आहेत. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची इच्छा असेल त्यांना कोरोना परिस्थिती अनुकूल झाल्यानंतर CBSE बोर्ड कडून त्यासंदर्भातील सूचना देण्यात येतील,अशी माहितीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षा ही प्राथमिकता – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड 

कोरोनाची सध्याची परिस्थिती, व आजारांच मुलांवर होणारा वाढता प्रार्दुभाव आणि परीक्षेचा संभ्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात वाढलेला तणाव विचारात घेता परीक्षा ऐवजी पर्यायी व्यवस्थेचा विचार करावा तसेच केंद्र सरकारने देश पातळीवर या संदर्भात एकसुत्र धोरण निश्चित करावे ही मागणी महाराष्ट्र शासनाने केली होती. या मागण्यांचा विचार करता केंद्रसरकारने CBSE ची बारावीची परीक्षा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हा निश्चितच स्वागतार्ह आहे. मुलाच्या शैक्षणिक जीवनातील बारावी परीक्षा ही महत्त्वाची पायरी असली तरीही सध्याची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षा ही आपल्या सर्वांची प्राथमिकता असली पाहिजे. या पुढे महाराष्ट्र शासन ही महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षांबाबत ही विद्यार्थ्यांचे आरोग्य व हित जोपासून लवकरच निर्णय घेईल,असे महाराष्ट्र शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.


हेही वाचा – CBSE-ICSE Board Exam: बारावी परीक्षांचे निर्णय देण्याआधीच केंद्रीय शिक्षण मंत्री AIIMS रुग्णालयात दाखल