घरआतल्या बातम्याCBSE Board 12th Result 2021: आज दुपारी २ वाजता निकाल होणार जाहीर

CBSE Board 12th Result 2021: आज दुपारी २ वाजता निकाल होणार जाहीर

Subscribe

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात CBSE बोर्ड इयत्ता १२ वीचा निकाल आज दुपारी २ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. CBSE बोर्डाची १२ वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना cbseresults.nic.in या सीबीएसईच्या अधिकृत वेवसाईटवर आपला निकाल जाणून घेता येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, CBSE बोर्ड इयत्ता १२ वी परीक्षा २०२१ साठी साधारण १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. कोरोना महामारीमुळे CBSE ने १२ वीची परीक्षा रद्द केली होती मात्र  या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार असल्याचे सांगितले जात आहे. CBSE बोर्डाचा १२ वीचा निकाल आज जाहीर होणार असून १०वीच्या परीक्षेचा निकालही लवकरच लागण्याची शक्यता आहे. मात्र बोर्डने अद्याप त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.

- Advertisement -

असा लागणार CBSE बोर्डाचा निकाल

CBSE ने १२ वीचा निकाल तयार करण्यासाठी मूल्यांकन पद्धतीचा अवलंब केला असून त्यासाठी १३ सदस्यांच्या समितीची निर्मिती केली होती. या पॅनेलच्या वतीने मूल्यमापनाचा ३०:३०:४० असा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे. यामध्ये दहावीच्या गुणांचे ३०, अकरावीच्या गुणांचे ३०आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे ४० टक्के गुण ग्राह्य धरले जाणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने CBSEआणि इतर राज्य मंडळाला ३१ जुलैपर्यंत १२ वीचा निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. २५ जुलैपर्यंत निकाल अंतिम करण्याचे काम शाळांकडून पूर्ण केले. त्यानुसार २५ ते ३१ जुलै दरम्यान निकाल जाहीर होणे अपेक्षित होते. त्यानुसार आज हा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

असा तपासा तुमचा निकाल

  • निकाल तपासण्यासाठी प्रथम सीबीएसईची अधिकृत वेबसाईट cbse.gov.in वर जावे लागेल.
  • त्यानंतर वेबसाईटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
  • आता विनंती क्रमांक जसे रोल नंबर इत्यादी सबमिट करावी लागेल.
  • आपला निकाल स्क्रीनवर दिसून येईल.
  • सीबीएसईने कोणतीही परीक्षा न घेता निकाल जाहीर करण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -