घरताज्या घडामोडीविरारमध्ये ICICI बँकेत दरोडा, एका महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू तर एक दरोडेखोर...

विरारमध्ये ICICI बँकेत दरोडा, एका महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू तर एक दरोडेखोर पोलिसांच्या ताब्यात

Subscribe

दरोडेखोर ICICI बँकेत पूर्वी मॅनेजर म्हणून काम करत होता

विरारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विरारच्या ICICI बँकेवर गुरुवारी रात्री सशास्र दरोडा टाकण्यात आला. विरार पूर्वच्या स्टेशन परिसरात असलेल्या ICICI बँकेत रात्री ८ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. बँकेतील जवळपास सर्व कर्मचारी निधून गेले होते. बँकेचे असिस्टंट मॅनेजर आणि इतर दोन कर्मचारी बँकेत उपस्थित होते. या घटनेनंतर विरारमध्ये चांगलीच खळबळ उडाली असून . दुर्दैवाने दरोडेखोरांच्या हल्ल्यात बँकेच्या असिस्टंट महिला मॅनेजरचा मृत्यू झालाय. (ICICI Bank robbery in Virar, one female employee killed, one robber in police custody)  योगिता वर्तक चौधरी असे या मृत महिलेचे नाव आहे. तर यात एक महिला गंभीररित्या जखमी झाली असून श्रद्धा देवरुखकर असे या जखमी महिलेचे नाव आहे. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही महिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला तर जखमी श्रद्धा यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नागरिकांमुळे एक दरोडेखोर गडाआड

विरारमधील ICICI बँकेत दोन दरोडेखोरांनी हल्ला केला होता. बँकेतील सोने आणि पैशांची बॅग घेऊन दरोडेखोर पळून जात असताना बँकेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आरडोओरड सुरू केला. त्यांच्या आवाजाने बँकेच्या आजूबाजूचे नागरिक बँकेबाहेर गोळा झाले. दरोडेखोर सोने आणि पैशांची बॅग घेऊन पळून जात असताना तिथल्या नागरिकांनी एक दरोडेखोरा पडकले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.

- Advertisement -

दरोडेखोर बँकेचा पूर्वीचा मॅनेजर

धक्कादायक बाब म्हणजे ज्या दरोडेखोराला स्थानिक नागरिकांनी पळून जात असताना पकडले तो दरोडेखोर ICICI बँकेत पूर्वी मॅनेजर म्हणून काम करत होता. त्यांनेच प्री प्लॉन करुन आपल्या साथीदाराच्या मदतीने बँकेत दरोडा टाकला. सध्या पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.


हेही वाचा – कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 2 ऑगस्टपर्यंत धो धो पाऊस!

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -