घरदेश-विदेश'हर घर तिरंगा' उपक्रमांतर्गत केंद्र सरकारकडून 'ध्वज' संहितेत बदल

‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत केंद्र सरकारकडून ‘ध्वज’ संहितेत बदल

Subscribe

आता दिवस - रात्र म्हणजे २४ तास तिरंगा फडकवण्याची परवानगी केंद्र सरकार कडून देण्यात आली आहे.

भारताचा तिरंगा म्हणजे सगळ्या भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. केंद्र सरकारकडून ध्वज संहिते मध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानुसार आता दिवस – रात्र म्हणजे २४ तास तिरंगा फडकवण्याची परवानगी केंद्र सरकार कडून देण्यात आली आहे. त्याचबरोबर पॉलिस्टर आणि मशीनवर तयार केल्या ध्वजालाही वंदन करता येणार आहे.

हे ही वाचा – मुद्रित माध्यमांमध्ये अजूनही उत्तरदायित्व

- Advertisement -

‘हर घर तिरंगा’ या उपक्रमांतर्गत संहितेत बदल करण्यात आला

सध्या देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजेच आझादी का अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गतच ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम राबविण्याची घोषणा करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत १३ ते १५ ऑगस्ट या कालावधित घरोघरी तिरंगा फडकविण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केले आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी या संदर्भातील एक पत्र सर्व केंद्रीय मंत्रालय आणि विभागांच्या सचिवांना दिले.

- Advertisement -

हे ही वाचा – जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राला सिल्वर मेडल

२० जुलै रोजी देण्यात आले आदेश

भारतीय ध्वज संहिता २०२० मध्ये २० जुलै २०२२ च्या आदेशानुसार यात सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी आणि घरी नागरिकांना तिरंगा फडकवता येणार आहे.

हे ही वाचा – आम्ही भगतसिंग यांची मुले, तुम्ही सावरकरांची…, केजरीवालांची नायब राज्यपालांवर टीका

दिवस – रात्र ध्वज फडकवता येणार

राष्ट्रध्वज वंदनासंदर्भातील काही नियम सुद्धा आहेत. ध्वज संहिता – २००२ आणि राष्ट्रीय सन्मानाचा अवमान प्रतिबंधक कायदा – १९७१ अंतर्गतच राष्ट्रध्वज वंदनासंदर्भांत नियम सांगण्यात आले आहेत. याच ध्वज संहितेमध्ये आता बदल करण्यात आला आहे. यापूर्वी राष्ट्रध्वज सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फडकविण्यात येत होता. तर या नव्या बदलानुसार राष्ट्रध्वज २४ तास फडकविण्याची परवानगी केंद्र सरकार कडून देण्यात आली आहे.

हे ही वाचा – नीरव मोदीवर ईडीची कारवाई; हिरे, दागिने आणि बँक ठेवींसह एकूण २५३ कोटींच्या…

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -