घरदेश-विदेशनीरव मोदीवर ईडीची कारवाई; हिरे, दागिने आणि बँक ठेवींसह एकूण २५३ कोटींच्या...

नीरव मोदीवर ईडीची कारवाई; हिरे, दागिने आणि बँक ठेवींसह एकूण २५३ कोटींच्या संपत्तीवर टाच

Subscribe

ईडीने नीरव मोदी याच्याशी संबंधित कंपनी, हिरे, दागिने, बँक ठेवी यांच्यासह एकूण २५३. ६२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून ईडीची मोठया प्रमाणावर कारवाई होत आहे. ईडीने(ED) आपला मोर्चा आता नीरव मोदीकडे वळवला आहे. पंजाब नॅशनल बँकेत कोट्यवधींचा घोटाळा करून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या विरोधात ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने नीरव मोदी याच्याशी संबंधित कंपनी, हिरे, दागिने, बँक ठेवी यांच्यासह एकूण २५३. ६२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

हे ही वाचा – ‘प्रसिद्धीसाठी याचिका नको’; सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सुनावले

- Advertisement -

ईडीने प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात असे म्हटले आहे, की नीरव मोदीच्या जप्त केलेल्या सर्व मालमत्ता ह्या हॉंगकॉंग मधील आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील चौकशीचा एक भाग म्हणून या सर्व मालमत्ता जप्त करण्यात आली आहेत. नीरव मोदीच्या(NIRAV MODI) हॉंगकॉंग मधील एका खासगी तिजोरीमध्ये हिऱ्यांचे दागिने आणि तिथलया बँक खात्यांमधील रोख रक्कम ठेवण्यात आली होती. ती सुद्धा जप्त करण्यात आली आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – Metaची घोषणा : आता फेसबुकचा लूक बदलणार, होमपेजवर न्यूज फीड ऑप्शन

मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीनुसार नीरव मोदीच्या मालमत्तेची तात्पुरती जप्ती करण्यात आली आहे. सध्या नीरव मोदी ब्रिटनच्या तुरुंगात आहे. त्याच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा २००२ च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्यातील नीरव मोदी मुख्य आरोपी आहे.

हे ही वाचा – ‘हर घर तिरंगा चळवळ’ मजबूत करण्याचे पंतप्रधान मोदींचे आवाहन; जाणून घ्या 22…

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -