घरताज्या घडामोडीPunjab New CM: चरणजित चन्नींचा कौन्सिलर ते मुख्यमंत्रीपर्यंतचा राजकीय प्रवास

Punjab New CM: चरणजित चन्नींचा कौन्सिलर ते मुख्यमंत्रीपर्यंतचा राजकीय प्रवास

Subscribe

पंजाबचे काँग्रेस प्रभारी हरीश राव यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी चरणजित सिंग चन्नी यांच्या नावाची घोषणा करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. कारण पंजाबच्या राजकीय वर्तुळात सुनील जाखड आणि सुखजिंदर सिंग रंधाव यांचं नाव नव्या मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत होते. परंतु अखेर समीकरण बदलले आणि काँग्रेसचा दलित चेहरा चरणजित सिंग चन्नी यांच्या नावावर मुख्यमंत्री पदासाठी शिक्कामोर्तब झाला. १५ मार्च १९६३ रोजी जन्म झालेले चरणजित सिंह चन्नी पंजाब पहिले दलित मुख्यमंत्री आहेत.

पंजाबच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा राजकीय प्रवास

चरणजित सिंह यांनी राजकारणातील सुरुवात कौन्सिलर पदापासून केली. ते तीन कौन्सिलर होते. तसेच ते नगरपरिषद खरारचे प्रमुख देखील होते. २००७ मध्ये चाम्कौर साहिबमधून चन्नी जिंकले आणि पंजाब विधानसभेत पोहोचले. त्यानंतर ते काँग्रेस पक्षात सामील झाले आणि २०१२-२०१७ मध्ये काँग्रेसच्या तिकटावर चाम्कौर साहिबमधून उभे राहिले आणि जिंकेल. २०१५ मध्ये काँग्रेसने सुनील जाखड यांना विरोधी पक्षनेते पदावरून हटवून चरणजित सिंह यांना विरोधी पक्षनेते पद दिले. २०१७मध्ये पहिल्यांदाच चन्नी मंत्रीमंडळात सामील झाले. सध्या चन्नी यांच्याकडे तंत्रशिक्षण, औद्यागिंक प्रशिक्षण, कर्मचारी निर्मितीत, पर्यटन आणि संस्कृती व्यवहार विभाग होते. चन्नी याचं राजशास्रात एमए झालं आहे. एवढेच नाहीतर त्यांनी एमबीए आणि एएलबीचे पण शिक्षण घेतले आहे.

- Advertisement -

चन्नी यांचा थोड्यात प्रवास

  • जन्म – १५ मार्च १९६३
  • राजकारणाची सुरुवात – तीन वेळा कौन्सिलर म्हणून काम केले. दोन वेळा नगर परिषद खरारचे प्रमुख राहिले आहेत.
  • पहिली निवडणूक – २००७मध्ये चाम्कौर साहिबमधून अपक्ष विजयी झाले. त्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
  • त्यानंतर २०१२ ते २०१७मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला.
  • २०१५ साली काँग्रेसच्या विरोधी पक्षनेते पदी चरणजित सिंह चन्नी यांच्या नावाची घोषणा केली.
  • मग २०१७ साली पहिल्यांदा मंत्रीमंडळात सामील झाले.
  • शिक्षण – बीए, एलएलबी आणि एमबीए
  • पत्नी – डॉ. कमलजीत कौर

वादात राहिलेले चन्नी

अकाली-भाजप सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग यांनी सभागृहात विचारले होते की, कॅप्टन सरकारच्या कार्यकाळात काय काम झाले? त्यावेळेस चन्नी विरोधी पक्षनेते होते. चन्नी या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाले की, कॅप्टनने पंजाबच्या रस्त्यांचे पॅचवर्क केले आहे. चन्नी या विधाननंतर खूप चर्चेत आले.

ज्योतिषशास्त्रावर विश्वार ठेवणारे चरणजित सिंग चन्नी यांनी स्केटर २ मधील शासकीय निवासस्थानासमोर एक रस्ता बांधला. ज्यानंतर खूप वाद झाला होता. चंडीगढ प्रशासनने पुन्हा रस्त्या पूर्ण करून ग्रीन बेल्ट विकसित केला.

- Advertisement -

तसेच चरणजित सिंग यांनी हत्तीवरून सवारी केली होती. त्यावेळी अशी चर्चा रंगली की, असे केल्याने मुख्यमंत्री बनू शकतात.


हेही वाचा – पंजाबचे नवे मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी, हायकमांडकडून दलित नेत्याला संधी


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -