घरताज्या घडामोडीहृदयविकाराचा झटक्यामुळे केदारनाथ यात्रेतील दोन भाविकांचा मृत्यू

हृदयविकाराचा झटक्यामुळे केदारनाथ यात्रेतील दोन भाविकांचा मृत्यू

Subscribe

केदारनाथ यात्रेत (Kedarnath Yatra) आणखी दोन भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. हृदयविकाराचा झटक्याने (Heart attack) या दोन भाविकांचा मृत्यू झाल्याचे समजते. पटेल धनीश भाई (32) आणि भानू शंकर प्रसाद (71) अशी या मृत भाविकांची नावे आहेत.

केदारनाथ यात्रेत (Kedarnath Yatra) आणखी दोन भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. हृदयविकाराचा झटक्याने (Heart attack) या दोन भाविकांचा मृत्यू झाल्याचे समजते. पटेल धनीश भाई (32) आणि भानू शंकर प्रसाद (71) अशी या मृत भाविकांची नावे आहेत. या यात्रेदरम्यान आतापर्यंत 44 भाविकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, चार धामांपैकी केदारनाथ धाममध्ये सर्वाधिक भाविकांचे मृत्यू झाले असूनही अद्याप आरोग्य विभाग (Medical Department) सतर्क नसल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी केदारनाथ यात्रेला गेलेल्या पटेल धनीश भाई आणि भानू शंकर प्रसाद यांची प्रकृती अचानक बिघडली. पटेल धनीश भाई हे गुजरातचे रहिवाशी असून, भानू शंकर प्रसाद हे पाटण्याचे रहिवाशी आहेत. प्रकृती बिघडल्याने या दोघांना आरोग्य केंद्रात नेण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा – Kedarnath Yatra : सलग सात तास झालेल्या बर्फवृष्टीमुळे केदारनाथ यात्रा स्थगित

आरोग्य केंद्रात पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. तसेच, आतापर्यंत केदारनाथ धाममध्ये 44 यात्रेकरूंचा मृत्यू झाला असून सर्वाधिक यात्रेकरू हृदयविकाराच्या झडक्यामुळे मरण पावले आहेत.

- Advertisement -

दरम्यान, चारधाममधील सर्वात कठीण प्रवास म्हणजे बाबा केदारनाथचा. येथे जाण्यासाठी गौरीकुंडापासून १८ किमीची डोंगर चढावा लागतो. श्रद्धेमुळे अनेक भाविक पायी प्रवास करणे पसंत करतात. त्यामुळे वाटेत त्यांची तब्येत बिघडते आणि त्यांना त्रास होऊ लागतो. याशिवाय केदारनाथ यात्रा मार्गापासून धामपर्यंत यात्रेकरूंना ऑक्सिजनच्या कमतरतेचाही सामना करावा लागतो.

91 प्रवाशांना ऑक्सिजन

‘शुक्रवारी 1,675 यात्रेकरूंची आरोग्य तपासणी आणि उपचार करण्यात आले. ज्यामध्ये 1,208 पुरुष आणि 467 महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत 40,351 यात्रेकरूंची ओपीडीद्वारे आरोग्य तपासणी व उपचार करण्यात आले आहेत. तर 91 प्रवाशांना ऑक्सिजन देण्यात आला’, असे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ बिदेश शुक्ला यांनी सांगितले.

‘आतापर्यंत ९३५ प्रवाशांना प्रवासादरम्यान ऑक्सिजन देण्यात आला आहे. त्याचबरोबर केदारनाथ धामच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची तब्येत बिघडल्यावर त्यांच्या आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात येत आहे’, असेही त्यांनी सांगितले. तसेच, यासाठी यात्रा मार्गापासून ते केदारनाथ धामपर्यंत डॉक्टरांना तैनात करण्यात आले आहे.


हेही वाचा – 100 वर्षांहून अधिक जुन्या मशिदींचे सर्वेक्षण करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -