घरदेश-विदेशअभ्यासापासून रोखण्यासाठी इराणमधील विद्यार्थिनींवर रासायनिक हल्ला

अभ्यासापासून रोखण्यासाठी इराणमधील विद्यार्थिनींवर रासायनिक हल्ला

Subscribe

नवी दिल्ली : इराणमध्ये शाळकरी विद्यार्थिनींच्या आजारी पडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून या विरोधात त्यांचे पालक आंदोलन करत आहेत. या आंदोलनप्रकरणी सोशल मिडियावर इराणचे काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमध्ये पोलीस महिलांचे केस ओढून त्यांना अटक करताना दिसत आहेत. सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मुलींच्या या आई असल्याचे सांगण्यात येत आहे.

डिसेंबर २०२२ पासून इराणमध्ये शाळकरी विद्यार्थिनी आजारी पडत असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. विद्यार्थिनींनी अभ्यास करू नये म्हणून शाळेतच त्यांना विष देण्यात येत असल्याचे समजते. शाळेच्या पाण्यात रासायनिक विष मिसळले जात होते. हे रासायनिक पाणी प्यायल्यानेच शेकडो विद्यार्थिनींना श्वास घेण्यास त्रास होत होता म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

- Advertisement -

सरकारने याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची आंदोलक पालकांची मागणी होती. त्यामुळे डिसेंबर २०२२ मध्ये सरकारकडून चौकशीचे आदेश देण्यात आले होते. मात्र, ३ महिने उलटूनही एकही अटक झाली नाही आणि कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे संतप्त पालकांनी आंदोलन सुरू केले आहे. त्याचवेळी पोलीस दल या आंदोलक महिलांचे केस ओढून त्यांना अटक करत आहेत.


उप-आरोग्य मंत्री युनुस पनाही यांनी २७ फेब्रुवारीला सांगितले की, घोम, बोरुजेर्डसारख्या शहरांमध्ये नोव्हेंबर २०२२ पासून श्वास घेण्यास समस्या प्रकरणी शेकडो प्रकरणांची नोंद झाली आहे. तसेच शाळेच्या पाण्यात रासायनिक विष मिसळले जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळेच विद्यार्थिनींना श्वास घेण्यास त्रास होत होता. याशिवाय विद्यार्थिनींना उलट्या होणे, शरीरात तीव्र वेदना तसेच मानसिक समस्यांचाही त्रास होता. उप-आरोग्यमंत्र्यांच्या मते काही लोक विद्यार्थिनींचे शिक्षण आणि विद्यार्थिनींच्या शाळा बंद करण्याचा प्रयत्न करत आहेत.

- Advertisement -

महसा अमिनीच्या मृत्यूनंतर विषबाधा होण्याच्या घटनांमध्ये वाढ
माध्यमांच्या वृत्तानुसार, महसा अमिनीच्या मृत्यूनंतर १६ सप्टेंबरपासून निदर्शने सुरू झाली आणि त्यानंतर विद्यार्थिनींना विषबाधा होण्याची प्रकरणे मोठ्या प्रमाणात समोर आली. १६ सप्टेंबर रोजी २२ वर्षीय महसाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. असे समजते की, तिने हिसाब घातला नव्हता त्यामुळे तिला अटक करण्यात आली होती. इराणमध्ये मुलींवर निर्बंध असून हिसाब घालण्याबाबतही कडक कायदे आहेत.
महसाच्या मृत्यूनंतर आणि हिसाबच्या विरोधात अनेक शाळकरी मुली रस्त्यावर उतरल्या होत्या. तेव्हापासून विद्यार्थिनींना विषबाधा होण्याच्या बातम्या मोठ्या प्रमाणावर समोर येऊ लागल्या. त्यामुळे सरकार आणि सरकारी एजन्सीवर विषप्रयोग करण्याचा आरोप करण्यात आला. या आरोपानंतर सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, विद्यार्थिनी खराब पाणी प्यायल्याने आणि पाण्यात वाढलेल्या बॅक्टेरियामुळे त्या आजारी पडत असल्याचा आमचा विश्वास आहे.

आंदोलन करणाऱ्या विद्यार्थिनींना मनोरुग्णालयात केले दाखल
इराण सरकारने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थिनींना मानसिक आजारी घोषित केले आहे. हिजाबला विरोध करणाऱ्या शाळकरी व महिविद्यालयीन विद्यार्थिनींची मानसिक स्थिती चांगली नसल्याचे इराणच्या शिक्षण मंत्र्यांचे म्हणणे आहे. या विद्यार्थिनींमध्ये समाजविघातक वर्तन फोफावत आहे. त्यामुळे या विद्यार्थिनींना मनोरुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. असे केल्याने त्या सुधारतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -