घरदेश-विदेश"आप याद बहोत आयेंगे...," न्यायमूर्ती शाहांच्या निरोप समारंभात सरन्यायाधीशांची शेरोशायरी

“आप याद बहोत आयेंगे…,” न्यायमूर्ती शाहांच्या निरोप समारंभात सरन्यायाधीशांची शेरोशायरी

Subscribe

आप याद बहोत आयेंगे," भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदावरून पायउतार झालेल्या "टायगर शाह" - न्यायमूर्ती एमआर शाह यांना निरोप दिला.

“आप याद बहोत आयेंगे,” भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदावरून पायउतार झालेल्या “टायगर शाह” – न्यायमूर्ती एमआर शाह यांना निरोप दिला. डीवाय चंद्रचूड यांनी पाकिस्तानी कवी ओबेदुल्ला अलीम यांचा हवाला देत म्हटले की, “आंख से दूर सही दिल से कहां जायेगा, जाने वाले तू हमारे याद बहुत आएगा.”(  Chief Justice DY Chndrachud s farewell message for supreme court judge tiger MR shah )

 न्यायमूर्ती शाह यांना त्यांच्या साहस आणि लढाऊ भावनेमुळे सरन्यायाधीश चंद्रचूड त्यांना प्रेमाने ‘टायगर शाह’ म्हणाले.

- Advertisement -

9 नोव्हेंबर 2022 रोजी न्यायमूर्ती शाह यांचा कॉलेजियममध्ये प्रवेश झाला त्या दिवशी माझी सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती. ते कॉलेजियममध्ये ते माझे एक जवळचे सहयोगी आहेत. तसेच शाह हे व्यावहारिक ज्ञानाने ते परिपूर्ण आहेत. तसचं न्यायमूर्ती शाह हे सल्ला देण्यात उत्कृष्ट आहेत. जेव्हा आम्ही अल्पावधीत पहिल्या सात नियुक्त्या केल्या, तेव्हा आम्हाला खूप मदत झाली,” न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी असं म्हणत शाह यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.

कोरोना काळात हे दोन्ही न्यायाधीश एकाच खंडपीठावर होते आणि दोघांनी मिळून अनेक ऑक्सिजन आणि कोविडच्या इतर तयारींसंबंधी तसंच, कोवीड काळातील अनेक तक्रारींबाबत एकत्र बसून सुनावणी केली होती.

- Advertisement -

सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी 1998 मध्ये गुजरात हायकोर्टात न्यायाधीश शाह यांना भेटलेल्या वेळेची आठवण करून दिली. ते म्हणाले की त्यांना एका खटल्यासाठी हजर व्हायचे होते पण ते त्यांचा युनिफॉर्म मुंबईत विसरले होते त्यावेळी न्यायमूर्ती शाह यांनी त्यांच्यासाठी आपल्या कनिष्ठाकडून युनिफॉर्मची व्यवस्था केली.

न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी न्यायमूर्ती शाह यांच्या अद्भुत विनोदबुद्धीचीदेखील प्रशंसा केली. शाह हे कॉलेजियममध्ये माझे एक मजबूत सहयोगी होते. तसचं त्यांचा सल्ला हा नेहमीच सर्वोत्तम असतो.

( हेही वाचा: कर्नाटक विजयानंतर ममतांचा सूर बदलला; काँग्रेसला पाठिंबा देण्याची तयारी, पण… )

भावूक झालेल्या न्यायमूर्ती शाह यांनी निरोप समारंभासाठी सगळ्यांचे आभार मानले आणि सांगितले की, त्यांनी आपले कर्तव्य न घाबरता, नि:पक्षपातीपणा किंवा इच्छा न बाळगता पार पाडले. ते म्हणाले, “मी माझा डाव खूप चांगला खेळला आहे. मी नेहमी माझ्या सद्सद्विवेक बुद्धीचे पालन केले आहे. मी नेहमी देव आणि कर्मावर विश्वास ठेवला आहे. मी कधीही कशाचीही अपेक्षा केली नाही. मी नेहमीच गीतेचे पालन केले आहे.

2 नोव्हेंबर 2018 रोजी सर्वोच्च न्यायालयात नियुक्त करण्यात आलेले न्यायमूर्ती शाह यांच्या निवृत्तीमुळे, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या आता 32 झाली आहे, ज्यात CJI देखील आहेत. एक दिवस आधी न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी पदावरून निवृत्त झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -