घरदेश-विदेशसरन्यायाधीश एन. व्ही. रमणांनी हक्क आणि संविधान जपले, सेवानिवृत्त कार्यक्रमात वरिष्ठ वकील...

सरन्यायाधीश एन. व्ही. रमणांनी हक्क आणि संविधान जपले, सेवानिवृत्त कार्यक्रमात वरिष्ठ वकील भावूक

Subscribe

नवी दिल्ली – देशाचे ४८ वे सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा आज सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात वरिष्ठ अधिवक्ता दुष्यंत दवे भावूक होत रडू लागले. एन.व्ही. रमणा यांनी न्यायपालिका, कार्यपालिका आणि संसदेमध्ये नियंत्रण ठेवण्याचं काम केलं, असं दुष्यंत दवे म्हणाले. एन.व्ही.रमणा हे नागरिकांचे न्यायाधीश होते, असंही ते म्हणाले. अशांत वातावरणातही संतुलन ठेवण्याचं कौशल्य एन.व्ही.रमणा यांच्यात होतं, असं ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल म्हणाले.

सरन्यायाधीशांच्या निरोपाच्या भाषणात अधिवक्ता दवे म्हणाले, ‘मी या देशातील नागरिकांच्या वतीने आज बोलत आहे. रमणा प्रत्येक नागरिकासाठी उभे राहिले. रमणा यांनी त्यांचे हक्क आणि संविधान जपले. रमणा यांनी त्यांच्या कार्यकाळात आमच्या अपेक्षा पूर्ण केल्या. न्यायव्यवस्था, कार्यपालिका आणि संसद यांच्यात नियंत्रण आणि संतुलन राखण्याचंही काम त्यांनी केलं.”

- Advertisement -

कपिल सिब्बल म्हणाले की, रमणा यांनी न्यायाधीशांच्या कुटुंबाचीही काळजी घेतली. संकटकाळातही समतोल राखण्यासाठी हे न्यायालय तुम्हाला लक्षात ठेवेल. या न्यायालयाची प्रतिष्ठा आणि अखंडता राखली आहे. सरकारलाही न्यायालयात उत्तर देण्यासाठी तुम्ही उद्युक्त केले.

२४ एप्रिल २०२२ रोजी एन.व्ही.रमणा यांनी सरन्यायाधीशाचा पदभार स्विकारला. ते देशाचे ४८ वे सरन्यायाधीश होते. १६ महिन्यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर आज ते सेवानिवृत्त झाले. एन.व्ही.रमणा यांच्या निवृत्तीनंतर उदय लळीत सरन्यायाधीश पदाचा पदभार स्विकारणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -