घरक्रीडाप्रो कबड्डीच्या 9 व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर

प्रो कबड्डीच्या 9 व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर

Subscribe

प्रो कबड्डीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रो कबड्डीच्या 9 व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

प्रो कबड्डीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रो कबड्डीच्या 9 व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. येत्या 7 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून प्रेक्षकांनाही सामना मैदानात बसून पाहता येणार आहे. या स्पर्धेचे आयोजक मशाल स्पोर्ट्सने याबाबात घोषणा केली आहे. (pro kabaddi league season 9 starts from October 7)

प्रो कबड्डीच्या 9 व्या हंगामातील सर्व सामने बंगळुरू, पुणे आणि हैदराबाद येथे खेळवले जाणार आहेत. गतवरर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रेक्षकांना सामना मैदानात बसून पाहण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली होती. त्यामुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र यंदाच्या 9 व्या हंगामात प्रेक्षकांना पुन्हा एकदा मैदानात जाऊन प्रो कबड्डी लीगचे सामने पाहता येणार आहेत.

- Advertisement -

कोरोना विषाणू नियंत्रणात आल्यानं आयोजकांनी हा निर्णय घेतलाय. महत्वाचे म्हणजे, येत्या डिसेंबरपर्यंत प्रो कबड्डीचे सामने रंगणार आहेत. हे सर्व सामने बंगळुरू, पुणे आणि हैदराबाद खेळवले जाणार आहेत.

प्रो कबड्डीच्या आठव्या हंगामाचे जेतेपद दंबग दिल्ली केसीने पटकावले. या हंगामातील अंतिम सामन्यात दिल्लीच्या संघाने तीन वेळा विजेता ठरलेल्या पटना पायरेट्सचा एक गुणाने पराभव केला. या हंगामात दिल्लीने पटनावर 37-36 विजय मिळवला होता.

- Advertisement -

सामना कुठे पाहता येणार?

प्रो कबड्डीचा नववा हंगामाचं स्टारस्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपण केलं जाईल. डिस्ने+हॉटस्टार वर लाइव्ह स्ट्रीमिंग केली जाईल.

खेळाडूंचा लिलाव

5 आणि 6 ऑगस्ट रोजी मुंबईत कबड्डीच्या खेळाडूंचा लिलाव करण्यात आला. लिलावात 500 हून अधिक खेळाडू बाजी मारणार असून 12 संघांना कबड्डीतील महान खेळाडूंसोबत आपला मजबूत संघ बनवायचा आहे.


हेही वाचा – बॅडमिंटन खेळताना हृदयविकाराचा झटका येऊन खेळाडूचा मृत्यू

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -