घरदेश-विदेशबापरे! तीन पाय असलेल्या बाळाचा झाला जन्म; घटना ऐकून सर्वच हैराण

बापरे! तीन पाय असलेल्या बाळाचा झाला जन्म; घटना ऐकून सर्वच हैराण

Subscribe

हे तीन पायांचं बाळ पाहण्यासाठी लोक दूरवरून येत असून सध्या सगळीकडे फक्त या बाळाचीच चर्चा आहे.

आतापर्यंत आपण तिळं जन्मला येणं, बाळाच्या हाता-पायांना जास्तीची बोटं असणं किंवा एका बाळाला दोन डोकं असणं असे प्रकार बातम्यांमधून ऐकले किंवा पाहिले आहेत. मात्र उत्तर प्रदेशातील गाजीपूर जिल्ह्यातून एक अजब घटना समोर आली आहे. तेथे तीन पाय असलेल्या बाळाचा जन्म झाला आहे. या घटनेने सर्वच हैराण झाले असून बाळाला पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. अनेकांनी हा दैवी चमत्कार असल्याचे म्हटले आहे. तर काही जण या मुलाच्या पाया पडण्यासाठी त्याच्या घरी मोठी गर्दी करत असल्याचे सांगितले जात आहेत.

बाळाचा तिसरा पाय गुप्तांगाशी जोडलेला

मिळालेल्या माहितीनुसार, हे तीन पायांचं बाळ पाहण्यासाठी लोक दूरवरून येत असून सध्या सगळीकडे फक्त या बाळाचीच चर्चा आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या गाजीपूर जिल्ह्यातील तियरा गावात घडली आहे. तियरा गावात राहणाऱ्या प्रियंका देवी यांनी २९ सप्टेंबर रोजी तीन पायांच्या बाळाला जन्म दिला. मुलाचा तिसरा पाय त्याच्या गुप्तांगाशी जोडला गेलेला असून या बाळाच्या पायाला सहा बोटे आहेत. तर मुलाचे आरोग्य उत्तम असून ते सामान्य बाळासारखेच असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

कुटुंबीयांची परिस्थिती नाजूक असल्याने मागितली मदत

या मुलावर उपचार करण्यासाठी कुटुंबीयांकडे पैसे नसून आपल्या मुलाच्या उपचारासाठी लोकांनी आपल्याला मदत करावी, असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे देखील मदत मागितली आहे. सहाय्यक मुख्य वैद्यकीय अधिकारी उमेश कुमार यांनी हा विशिष्ट प्रकारचा आजार असून या आजाराला कंजेनिटल अनोमिली असे सांगितले आहे.

बाळाच्या जन्मानंतर कुटुंबीयांना धक्का

एका हिंदी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक मुख्य वैद्यकीय अधिकारी उमेश कुमार यांनी असे सांगितले आहे की, या आजारात रुग्णांवर तपासणीनंतर उपचार होतात अशी माहिती दिली आहे. गरोदर महिला जर रेडिएशनच्या संपर्कात आली किंवा एखाद्या औषधाचा साइड इफेक्ट झाल्यास अशा प्रकारचं मूल जन्माला येते. बाळाच्या जन्मानंतर कुटुंबीयांना देखील थोडा धक्का बसला असून त्याच्या उपचारासाठी येणाऱ्या खर्चाची चिंता आहे.


वरळी किल्ल्याला मिळणार नवी झळाळी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -