घरCORONA UPDATEchildren vaccine : देशात लहान मुलांना लवकरं मिळणार covovax लस, दोन फेजमध्ये...

children vaccine : देशात लहान मुलांना लवकरं मिळणार covovax लस, दोन फेजमध्ये ट्रायल सुरु

Subscribe

लहान मुलांना कोरोनाविरोधी लस केव्हा मिळणार याकडे पालकाचे लक्ष होते. मात्र देशात सध्यातरी १८ वर्षावरील नागरिकांनाच लस दिली जात आहे. त्यामुळे १८ वर्षाच्या आतील मुलांना लस अद्याप दिली जात नाही. यातच आता महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये शाळा- कॉलेज सुरु होणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता पालकांना मुलांच्या आरोग्य चिंता सतावत आहे. पण आता लवकरचं लहान मुलांना लस मिळण्याची शक्यता आहे.

त्यामुळे देशातील ७ ते ११ वर्षांच्या आतील मुलांना कोरोनाची लस घेण्यासाठीची प्रतीक्षा लवकरंच संपणार आहे, कारण पुण्यातील भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात बुधवारपासून कोवोव्हॅक्स लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू झाल्या आहेत. सध्या ही ट्रायल ७ ते ११ वर्षे वयाच्या मुलांवर केली जात आहे. या लसीच्या चाचणीत ९ मुलांची नोंदणी करण्यात आली आहे.

- Advertisement -

भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ संजय लालवानी यांनी सांगितले की, जे पालक आपल्या मुलाला चाचणीसाठी नोंदणी करू इच्छितात त्यांना स्थानिक भाषेत समुपदेशन दिले जाते आणि ऑडिओ व्हिज्युअल कंसल्टिंग प्रक्रिया रेकॉर्ड करण्यात आली. एकदा पालकांनी संमती दिल्यास, स्वयंसेवकाची आरटी-पीसीआर चाचणी आणि अँटीबॉडी चाचणी केली जाईल. चाचणीच्या या टप्प्यासाठी भारतात नऊ केंद्रे सुरु करण्यात आली आहे. ज्यात भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचा समावेश आहे.

भारतात लहान मुलांसाठी कोरोनाविरोधी लसीची चाचणी सुरू झाली आहे. त्यात २ ते १७ वर्षे मुलांचा समावेश आहे. कोव्होवॅक्स लस ही भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन आणि झायडस कॅडिलाच्या झीकोव्ही-डी नंतर मुलांवर चाचणी केली जाणारी तिसरी लस आहे. पुण्यात सुरु झालेल्या ट्रायलदरम्यान मुलांना २१ दिवसांच्या अंतराने दोन डोस दिले जातील. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने भारतात आणलेल्या नोवोव्हॅक्स लसीची भारतीय आवृत्ती कोव्होव्हॅक्स आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -