घरदेश-विदेशचीन पाकसाठी बांधणार युद्धनौका

चीन पाकसाठी बांधणार युद्धनौका

Subscribe

पाकिस्तानच्या लष्करी ताकदीमध्ये आता वाढ होणार आहे. कारण, पाकिस्तानसाठी चीन अत्याधुनिक अशा लढाऊ युद्धनौकेची बांधणी करत आहे.

चीन आणि पाकिस्तानची मैत्रि सर्वश्रुत आहे. आता याच मैत्रिला जागून चीन पाकिस्तानसाठी अद्ययावत अशी युद्धनौका बांधणार आहे. त्यासंदर्भातील एक रिपोर्ट चायना डेलीनं प्रसिद्ध केला आहे. चायना डेलीनं दिलेल्या रिपोर्टनुसार चीन पाकसाठी चार अद्ययावत अशा युद्धनौकांची बांधणी करणार आहे. बांधण्यात येणारी युद्धनौका ही 054A या प्रकारातील असेल. पाकिस्तान – चीनमधील शस्त्र खरेदी करारातंर्गत अद्यायावत अशा युद्धनौकेची बांधणी होणार आहे. हिंद महासागरात वर्चस्व राखण्यासाठी या युद्धनौकेचा मोठा फायदा पाकिस्तानला होणार आहे. अद्ययावत अशा युद्धनौकेवर जहाजविरोधी यंत्रणा, पाणबुडीविरोधी यंत्रणा आणि विमानविरोधी यंत्रणा देखील असणार आहे. त्यामुळे पाकिस्तानला त्याचा मोठा फायदा होणार आहे. शिवाय, अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणा देखील युद्धनौकेवर असणार आहे. शांघायमधील शीपयार्डमध्ये या अद्ययावत अशा युद्धनौकेची बांधणी केली जाणार आहे. पाकिस्तानला शस्त्र पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत चीन प्रथम क्रमांकावर आहे. तसेच दोन्ही देश मिळून आता जेएफ-थंडर या एकाच इंजिनवर चालणाऱ्या अद्ययावत अशा लढाऊ विमानाची देखील बांधणी करत आहे.

पाकिस्तानच्या सागरी ताकदीमध्ये वाढ करण्यासाठी, भविष्याचा विचार करता अद्ययावत अशी आणि शांततेसाठी या युद्धनौकेची उभारणी करण्यात येत आहे. दरम्यान, पाकिस्तानला त्यांच्या सागरी सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी देखील या युद्धनौकेचा मोठा फायदा होणार असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं गेलं आहे. सागरी महत्व ओळखत चीननं श्रीलंकेकडून हंबनटोटा हे बंदर सध्या ९९ वर्षाच्या करारानं देखी घेतलं आहे. दरम्यान, अत्याधुनिक अशा लढाऊ युद्धनौकेमुळे पाकिस्तानच्या सागरी ताकदीमध्ये वाढ होणार आहे. अशी माहिती देखील चायना डेली या वृत्तपत्रानं दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -