घरदेश-विदेशकाँग्रेसचा खोटारडेपणा जाहीर; पर्रिकरांचे सडेतोड उत्तर

काँग्रेसचा खोटारडेपणा जाहीर; पर्रिकरांचे सडेतोड उत्तर

Subscribe

राफेल करारासंबंधी काँग्रेसने जारी केलेल्या ऑडिओ क्लिपला मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांनी सडेतोड उत्तर दिले आहे. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतरही काँग्रेस अशा प्रकारच्या क्लिप जारी करत असून यातून काँग्रेसचा खोटेपणा जाहीर झाल्याचे पर्रिकर यांनी म्हटले आहे.

राफेल करारावरुन काँग्रेसने पत्रकार परिषदेत घेऊन एक ऑडिओ क्लीप जारी केली आहे. ही ऑडिओ क्लिप गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांची असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. त्याचबरोबर गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या घरात राफेल घोटाळ्याचे कागदपत्र असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसच्या या आरोपाला आणि त्यांच्या कथित ऑडिओ क्लिपला मनोहर पर्रिकर यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन हे उत्तर दिले आहे. काँग्रेसच्या या कथित क्लीपमुळे काँग्रेसचा खोटारडापणा जाहीर झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – ‘मनोहर पर्रिकर यांच्या बेडरुममध्ये राफेल घोटाळ्याचे रहस्य’

- Advertisement -

नेमकं काय म्हणाले मनोहर पर्रिकर?

काँग्रेसच्या ऑडिओ क्लीपवर उत्तर देताना मनोहर पर्रिकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, राफेल करारावर सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतरही काँग्रेस अशा प्रकारच्या खोट्या व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करत आहे. यावरुन काँग्रेसचा खोटारडेपणा जाहीर झाला असल्याचे पर्रिकर यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर काँग्रेसकडून सत्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळेच अशा प्रकारची ऑडिओ क्लिप जारी करण्यात आली आहे. राफेल संदर्भात कधीही कॅबिनेट अथवा अन्य कोणत्याही बैठकीत चर्चा झालेली नसल्याचे पर्रिकरांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘काँग्रेसने इतक्या खालच्या पातळीवर राजकारण करु नये’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -