घरदेश-विदेशचीनचा संधिसाधूपणा! रशिया-युक्रेन युद्धादरम्यान चीनच्या 29 लढाऊ विमानांची तैवानमध्ये घुसखोरी

चीनचा संधिसाधूपणा! रशिया-युक्रेन युद्धादरम्यान चीनच्या 29 लढाऊ विमानांची तैवानमध्ये घुसखोरी

Subscribe

तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, त्यांच्या देशाच्या हवाई दलाने 29 चिनी विमाने इशारे देऊन उडवली

युक्रेन- रशियाच्या युद्धादरम्यान चीनने संधी साधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या 19 दिवसांत दोनवेळा चीनच्या लढाऊ विमानांनी तैवानमध्ये घुसखोरी केली आहे. बुधवारी जवळपास 29 लढाऊ विमाने तैवानला पाठवण्यात आली. यानंतर तैवानच्या हवाई दलाने इशारा देत, चिनी लढाऊ विमानांना आपल्या हवाई हद्दीतून बाहेर काढले. चीनने स्वतः तैवानचा परिसर एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन म्हणून घोषित केला आहे.

तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, त्यांच्या देशाच्या हवाई दलाने 29 चिनी विमाने इशारे देऊन उडवली. या घुसखोरीत चिनी हवाई दलाची सात J-10 ही लढाऊ विमानं, पाच J-16 लढाऊ विमान आणि 1Y8 इलेक्ट्रॉनिक युद्ध विमाने सहभागी झाल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. या विमानांनी तैवान नियंत्रित प्रतास द्वीपसमूह जवळ दक्षिण चीन समुद्रात उड्डाण केले. दरम्यान चीन तैवानवर हल्ला करु शकतो अशी भीती अमेरिकेने अनेकदा व्यक्त केली होती. तसेच झाल्यास तैवानच्या मदतीसाठी सैन्य पाठवेल, अशी उघड घोषणाही अमेरिकेने केली आहे.

- Advertisement -

चीनचा सिक्रेट प्लॅन झाला लीक

चीनच्या एका मानवाधिकार कार्यकर्त्याने दावा केला की, चीनचा सिक्रेट प्लॅन एका ऑडिओ क्लिपमध्ये कैद झाला आहे. त्यांनी 57 मिनिटांची ऑडिओ क्लिप जारी करत दावा केला की, चीनचे उच्च लष्करी अधिकारी तैवानवरील हल्ल्याबद्दल बोलत आहेत. हा ऑडिओ समोर आल्यानंतर चीनने त्याला स्पष्ट नकार दिला, चीनची कोणताही सिक्रेट प्लॅन अशा प्रकारे लीक होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जात आहे.

लीक झालेल्या ऑडिओमधील सिक्रेट प्लॅन नेमका काय?

या ऑडिओ क्लिपनुसार, चिनी सैन्याला पर्ल नदी डेल्टाजवळ सी डिफेन्स ब्रिगेड बनवायची होती. हा परिसर साखर उद्योगाचे केंद्र मानला जातो. या नदी डेल्टामध्ये चीनची अनेक महत्त्वाची शहरे आहेत. या ऑडिओमध्ये तैवान सामुद्रधुनी मध्य आणि दक्षिण चीन समुद्र यांच्यात समन्वय निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

तैवानवरून वाद का?

चीनचा असा विश्वास आहे की, तैवान हा आपला एक प्रांत आहे, जो शेवटी एक दिवस पुन्हा चीनचा भाग होईल. दुसरीकडे तैवान स्वतःला स्वतंत्र देश मानतो. त्याचे स्वतःचे संविधान आहे आणि लोकांद्वारे निवडलेल्या सरकारद्वारे राज्य केले जाते.


आम्ही विमानात बसणार इतक्यात तुम्ही.., शिंदेंनी ट्विट केलेल्या पत्रानंतर अयोध्येबाबत मोठा खुलासा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -