घरताज्या घडामोडीआता रशियाच्या 'व्लादिवोस्तोक' शहरावर चीनचा दावा

आता रशियाच्या ‘व्लादिवोस्तोक’ शहरावर चीनचा दावा

Subscribe

भारत-चीनमध्ये लडाख सीमेवरील तणाव वाढत आहे. आता चीनने रशियाच्या व्लादिवोस्तोक शहरावर स्वतःचा दावा केला आहे. चीनची सरकार वृत्तवाहिनी सीजीटीएनचे संपादक शेन शिवेई यांनी दावा केला आहे की, ‘१८६० पूर्वी रशियाचे व्लादिवोस्तोक शहर चीनचा भाग होता.’ एवढचं नाही तर ते म्हणाले की, ‘हे शहर पूर्वी हैशेनवाई नावाने ओळखले जात होते. रशियाने एकतर्फी करारानुसार चीनकडून हिसकावून घेतले.’

चीनमधील सर्व माध्यम संस्था या सरकारी आहे. चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या इशाऱ्यावरून माध्यमात असलेले लोक काहीही लिहितात आणि बोलतात. चिनी माध्यमात लिहिले कोणत्याही गोष्टी सरकारच्या विचारसरणी नुसार असतात असे म्हटले जाते. अशा परिस्थितीत शेन शिवाई यांचे ट्विट महत्त्वपूर्ण ठरते. अलीकडचे चीन आणि रशियाचे संबंधात कटुता निर्माण झाली आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी रशियाने चिनी गुप्तचर यंत्रणेवर पाणबुडीशी संबंधित मुख्य सीक्रेट फाईल चोरल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी रशियाने आपल्या एका नागरिकाला अटक केले होते. या नागरिकावर देशद्रोहाचा आरोप लावला होता. हा आरोपी रशियन सरकारमध्ये मोठ्या पदावर होता. या आरोपीने ही फाईल चीनला दिली होती.

- Advertisement -

आशियातील चीनच्या विस्तारवादी धोरणांमुळे भारताला सर्वाधिक धोका आहे. त्याचे प्रत्यक्ष उदाहरण लडाखमध्ये चिनी सैन्याच्या जमावाने दिले आहे. याशिवाय पूर्व चीन समुद्रात असललेल्या बेटांवर चीन आणि जपानमध्ये तणाव जास्त आहे. अलीकडे जपानने चिनी पाणबुडीला आपल्या जलक्षेत्रातून काढून टाकले होते. चीनने अनेक वेळा तैवानवर सैन्याचा वापर करण्याची उघडपणे धमकी दिली आहे. या दिवसांमध्ये चिनी लढाऊ विमानांनी अनेकदा तैवानच्या हवाई क्षेत्राचे उल्लंघन केले आहे. त्याचबरोबर फिलिपिन्स, मलेशिया, इंडोनेशियबरोबरही चीनचे वाद आहेत.

पॅसिफिक महासागरात तैनात असलेल्या ताफ्यांचा मुख्य तळ रशियाचे व्लादिवोस्तोक शहर आहे. रशियाच्या ईशान्य भागात वसलेले हे शहर प्रिमोर्स्की क्राय राज्याची राजधानी आहे. हे शहर चीन आणि उत्तर कोरियाच्या सीमेजवळ आहे. रशियातील व्लादिवोस्तोक शहर व्यावसायिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या सर्वात महत्त्वाचे आहे. रशियाचे बहुतेक व्यापार या बंदरातून होतो. दुसऱ्या महायुद्धात येथे जर्मनी आणि रशियाच्या सैन्यामध्ये भीषण युद्ध झाले होते.


हेही वाचा – पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांच्यात फोनवरुन चर्चा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -