घरअर्थजगतकंपन्यांच्या शिफ्टिंगमुळे चीन चिंतेत; भारत आमची जागा घेऊ शकत नाही

कंपन्यांच्या शिफ्टिंगमुळे चीन चिंतेत; भारत आमची जागा घेऊ शकत नाही

Subscribe

औद्योगिक कंपन्यांनी चीनमधून काढता पाय घेतल्याने चीनने चिंता व्यक्त केली आहे. भारत आमची जागा घेऊ शकत नाही, असा दावा चीनने केला आहे.

जगातील बहुतेक देशांची अर्थव्यवस्था कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे कोसळली आहे. क्षीण होत चाललेली अर्थव्यवस्था पाहता चीनला मागे टाकून औद्योगिक साखळी विस्तारात आपलं स्थान निर्माण करण्याचा भारताचा प्रयत्न आहे. चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने भारताच्या या प्रयत्नांवर चिंता व्यक्त केली आहे. चीनमधील अनेक कंपन्या आता भारतात मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स सुरू करण्याच्या विचारात आहेत. चीन सरकार पुरस्कृत चायनीज डेली ग्लोबल टाईम्सने भारताच्या प्रयत्नांवर चिंता व्यक्त केली आणि ते म्हणाले की भारत चीनची जागा घेऊ शकत नाही.

कंपन्यांच्या निर्णयावरून चीन नाराज

अलीकडेच एका जर्मन शू कंपनीने आपलं उत्पादन युनिट चीनमधून उत्तर प्रदेशमध्ये हलविण्यास सांगितलं. त्यानंतर चीनने चींता व्यक्त केली. त्याचप्रमाणे इतरही अनेक कंपन्या भारतात येण्यास उत्सुक आहेत. याशिवाय अनेक कंपन्या चीनबाहेर जाण्याचा विचार करत आहेत. ग्लोबल टाइम्सने लिहिलं आहे की मीडिया रिपोर्टनुसार उत्तर प्रदेशने चीनमधील अशा मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी आर्थिक टास्क फोर्सची स्थापना केली आहे जे या बदलांची योजना आखत आहेत.

- Advertisement -

भारत यशस्वी होणार नाही – ग्लोबल टाईम्स

तथापि, एवढे प्रयत्न करूनही कोरोना साथीच्या काळात आर्थिक दबावाच्या पार्श्वभूमीवर भारताला चीनची जागा घेणं कठीण आहे. ग्लोबल टाईम्सने म्हटलं आहे की, काही कट्टर समर्थक असा दावा करत आहेत की भारत चीनला मागे काढत आहे, परंतु हे राष्ट्रवादी विचारसरणीशिवाय काही नाही. ग्लोबल टाईम्सचे म्हणणं आहे की, हा आविर्भाव आर्थिक बाबी पलीकडे सैन्य पातळीपर्यंत गेली आहे. काही लोकांना चुकून असं वाटतंय की आता चीनसोबत सीमवर लढू शकतो. असा विचार निःसंशयपणे धोकादायक आणि दिशाभूल करणार आहे.


हेही वाचा – औरैया अपघात: योगी सरकारने जखमी कामगारांना मृतदेहांसह ट्रकमधून पाठवलं

- Advertisement -

बरेच भारतीय खरी परिस्थिती विसरले

चिनी वृत्तपत्रांनी म्हटलं आहे की पाश्चिमात्य माध्यमांनीही यावेळी चीनच्या बाजाराच्या संभाव्यतेची तुलना करून भारताचा उत्साह वाढविला आहे. ज्यामुळे काही भारतीय वास्तविक परिस्थितीबद्दल संभ्रमित झाले आहेत. सध्या भारत चीनची जागा घेईल, हा विचार कल्पनेच्या पुढचा आहे. चीन आणि अमेरिका यांच्यातील तणाव भारताला औद्योगिक क्षेत्राला आकर्षित करण्याची संधी नाही. कारण दक्षिण आशियाई देशांमध्ये त्यांच्या निकृष्ट पायाभूत सुविधांची कमतरता, कुशल कामगार नसणे आणि परकीय गुंतवणूकीच्या कठोर बंधनामुळे मॅन्यूफॅक्चरिंग शिफ्टिंगसाठी तयार नाहीत.

भारताच्या रणनीतीवर निशाणा साधत ग्लोबल टाईम्सने म्हटलं आहे की भारत पुढील जागतिक औद्यौगिक देश होण्याचं स्वप्न पाहत आहे आणि मोदी सरकारनेही ‘मेक इन इंडिया’ मोहिमेसारख्या उद्दीष्टांसाठी विविध उपक्रम सुरू केले आहेत, ज्याचा जगावर फारसा परिणाम होऊ शकला नाही. व्यावहारिक सुधारणा करण्यात अपयशी ठरल्याबद्दल निरीक्षकांनी सामान्यत: भारताच्या मॅन्युफॅक्चरिंगवर ठपका ठेवला आहे. जर ते योग्य पद्धतीने केलं गेलं तर ते फुसक्या घोषणेपेक्षा अधिक प्रभावी ठरलं असतं.

सध्या आशिया-पॅसिफिकच्या अर्थव्यवस्थांमध्ये प्रचंड बदल होत आहेत आणि औद्योगिक साखळ्यांना कोरोना विषाणूचा धक्का बसत आहे. भौगोलिक राजनैतिक पद्धतींमध्ये ड्रॅगन आणि हत्ती यांच्यातील लढाईही वेगाने विकसित होत आहे. परंतु दोन प्रमुख उदयोन्मुख बाजारपेठा एकत्र येण्याचा मार्ग शोधू शकतील.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -