घरताज्या घडामोडीचीनने कोरोना व्हायरस संदर्भात दिली 'ही' महत्त्वाची माहिती

चीनने कोरोना व्हायरस संदर्भात दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

Subscribe

चीनने कोरोना व्हायरस संदर्भात श्वेत पत्रिका काढली असून त्या महत्त्वाची माहिती दिली आहे.

जगभरात कोरोना विषाणूचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तर चीनच्या वुहान शहरातून पसरणाऱ्या कोरोनाने सर्वच देशात दहशत निर्माण केली आहे. या विषाणूमुळे अमेरिकेसह अनेक बलाढ्य देशांना याचा फटका बसला आहे. अमेरिकेत १ लाखाहून अधिक लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे अमेरिका सातत्याने कोरोनावरुन चीनवर आरोप करत आहे. या दरम्यान. चीनने एक श्वेत पत्र जारी केले असून कोरोना विषाणूच्या प्रसाराची माहिती उशिरा देण्याच्या आरोपाने घेरलेल्या चीनने पुन्हा एकदा स्वत:ला निर्दोष ठरवले आहे.

कोरोनाचे पहिले प्रकरण

कोरोनाचे पहिले प्रकरण २७ डिसेंबर रोजी वुहानमध्ये उघडकीस आले होते, तर न्यूमोनिया आणि मानवाकडून मानवापर्यंत संसर्ग पसरण्याची माहिती १९ जानेवारी रोजी उघडकीस आली. यावर अंकुश ठेवण्यासाठी त्वरित कारवाई सुरु केली असल्याचेही चीनने म्हटले आहे.

- Advertisement -

काय आहे श्वेत पत्रात?

वृत्तसंस्था पीटीआयने चीनी माध्यमांच्या अहवालात म्हटले आहे की, चीनी सरकारद्वारे जारी करण्यात आलेल्या श्वेत पत्रिकेत गेल्याच वर्षी वुहानमध्ये कोरोना विषाणूचे प्रकरण समोर आले होते. मात्र, हे प्रकरण लपवण्यात आले. तसेच या विषाणूमुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि आर्थिक संकट उद्भवणाऱ्या प्राणघातक रोगाविषयी पारदर्शक माहिती देत नसल्याचा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अनेक देशांच्या नेत्यांनी केला आहे.

श्वेतपत्रानुसार, २७ डिसेंबर २०१९ रोजी वुहानमधील रुग्णालयाद्वारे कोरोना विषाणूची ओळख पटल्यानंतर, स्थानिक सरकारने ही परिस्थिती पाहण्यासाठी तज्ञांची मदत घेतली आहे. श्वेतपत्रिकेत म्हटले आहे की, राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (एनएचसी) स्थापन केलेल्या उच्चस्तरीय तज्ज्ञ संघाने १९ जानेवारी रोजी पहिली पृष्टी केली की, मानवापासून मानवापर्यंत संसर्ग पसरु शकतो. मात्र, या विषाणूचा माणसापासून माणसापर्यंत प्रसार होत असल्याने ते टाळण्यासाठी त्वरित कारवाई सुरु केली होती.

- Advertisement -

हेही वाचा – लसीशिवाय कोरोनाला हरवणं शक्य! या देशानं दाखवून दिलं; एकही रुग्ण शिल्लक नाही!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -