घरताज्या घडामोडीचीनमध्ये पावसाचा हाहाकार ! सबवे मेट्रो पाण्याखाली, २५ जणांचा मृत्यू

चीनमध्ये पावसाचा हाहाकार ! सबवे मेट्रो पाण्याखाली, २५ जणांचा मृत्यू

Subscribe

चीनमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या महापूराने जवळपास २५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये झेंगझोऊ येथील सबवेमध्ये अडकलेल्या १२ जणांचा समावेश आहे. चीनच्या हेनान प्रांतात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात आलेल्या पुराचा फटका बसला आहे. सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून अनेक प्रवासी हे चीनच्या पूराच्या पाण्यात भूयारी मेट्रोत अडकल्याचेही वृत्त आहे. झेंगझोऊ शहराच्या सबवे लाईन या पाण्याखाली गेल्या आहेत. जवळपास सव्वा कोटी लोकसंख्येच्या शहरात पूराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. आतापर्यंत जवळपास ५०० जणांना या पूराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहे. तर २ लाख नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे.

- Advertisement -

सर्वोच्च स्वरूपाचा आपत्कालीन अलर्ट यानिमित्ताने जारी करण्यात आला आहे. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी बुधवारी सर्व यंत्रणांना आदेश देतानाच पिपल्स लिबरेशन आर्मीला नागरिकांच्या मदतीसाठी पाचारण केले आहे. अनेक लोक सबवे, हॉटेल्स आणि सार्वजनिक ठिकाणी अडकलेले असल्यानेच त्याठिकाणी मदतीसाठी हे मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. पीएलएच्या तीन हजार मनुष्यबळाच्या माध्यमातून याठिकाणी मदतकार्य करण्यात येत आहे. पूर नियंत्रण तसेच नागरिकांना रेस्क्यू करण्यासाठी ही मदत दिली जात आहे. एका धरण फुटून महापूर आल्याची भीती सध्या नागरिकांमध्ये आहे. तर स्थानिक प्रसारमाध्यमांनी याठिकाणी अनेक घरांचे तसेच बांधकामाचे नुकसान झाल्याची माहिती दिली आहे.

अवघ्या तीन दिवसातच याठिकाणी ६१७ मिमी पावसाची नोंद झाली. याठिकाणी सरासरी ६४० मिमी वर्षापोटी पावसाची नोंद होत असते, अशी माहिती एका संकेतस्थळाने जाहीर केली आहे. या शहरामध्ये एकाच दिवसात २०१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. याठिकाणी १९५१ नंतर इतक्या मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाल्याचे समोर आले आहे. याठिकाणी

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -