घरताज्या घडामोडीमोठी बातमी ! संपूर्ण मंत्रीमंडळाने दिला राजीनामा, सर्वात मोठा फेरबदल

मोठी बातमी ! संपूर्ण मंत्रीमंडळाने दिला राजीनामा, सर्वात मोठा फेरबदल

Subscribe

आंध्र प्रदेशच्या संपूर्ण कॅबिनेटनेच राजीनामा दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री जगन रेड्डी आता नव्याने आपल्या मंत्रीमंडळाची निवड करणार आहेत. मुख्यमंत्री वाईएस जगन मोहन रेड्डी यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याआधी संपूर्ण कॅबिनेटमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार संपूर्ण कॅबिनेटच्या २४ मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. त्यामुळे कॅबिनेट मंत्र्यांमध्ये फक्त एकमेव मुख्यमंत्री असे आहेत, ज्यांच्याकडे मंत्रीपद आहे.

मंत्रीमंडळात बदल करणे हे आधीच ठरले होते. मंत्र्यांच्या मंत्रीपदाचा अर्धा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनीच टीम बदलणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार डिसेंबर २०२१ मध्येच हे मंत्रीमंडळातील बदल होणे अपेक्षित होते. पण कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे हे बदल झाले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी बुधवारी राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन यांच्याशी भेट घेऊन मंत्रीमंडळातील बदलांबाबतची माहिती दिली.

- Advertisement -

सर्वात मोठा फेरबदल

सरकार स्थापनेनंतर आतापर्यंतचा हा सर्वात मोठा फेरबदल आहे. जगनमोहन सरकारने घेतलेला हा सर्वात मोठा बदल आहे. बदललेल्या मंत्र्यांच्या नावांची यादी ही राज्यपालांना पाठवण्यात येणार आहे. सध्याच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांनी ८ जून २०१९ रोजी शपथ घेतली होती. एन्टी इन्कम्बसी टाळण्यासाठी या निर्णयाची मदत होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांना आहे. त्याशिवाय २०२४ च्या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी रणनिती आखण्यासाठीही हा निर्णय महत्वपूर्ण असा आहे. त्यासाठीच आणखी जिल्ह्यांच्याही निर्णय घेण्यात आला. विकेंद्रीकरणासाठी जिल्ह्यांचा निर्णय घेण्याला प्राधान्यही या सरकारने दिले आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -