एकत्र आलो तर भाजपला १०० जागाही जिंकू देणार नाही, मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा दावा

cm nitish kumar

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांना एकत्र येऊन पुढील लोकसभा निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला आहे. आम्ही एकत्र लढलो तर भाजपला 100 जागाही जिंकू देणार नाही, त्यांना 100 जागांच्याही खाली आणू, असा दावा मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केला आहे.

संविधानच्या रक्षणासाठी आणि लोकतंत्राबाबत भाकपा-माले यांच्याद्वारे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नितीश कुमार यांनी या कार्यक्रमाला संबोधित करत भाजपवर निशाणा साधला. नितीश कुमार यांनी काँग्रेसह सर्व विरोधी पक्षांनी सांगितलं की, मला आता कोणतंही पद भूषवण्याची इच्छा नाही. अनेक लोकं आपल्या मनाने घोषणा बाजी करतात. मी तर नको म्हणतो. कारण हे सर्व चुकीचं आहे. परंतु माझी एक इच्छा आहे की, सर्वांनी एकत्र मिळून निवडणूक लढवावी. त्यासाठी मी वाट पाहत आहे. आता उशीर करू नका, असं नितीश कुमार म्हणाले.

मी पंतप्रधान पदाचा दावेदार नाही किंवा उमेदवारही नाही. निवडणुका आल्यानंतर लोकचं आपला पंतप्रधान निवडतील, असंही कुमार म्हणाले.

उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी सुद्धा सर्व पक्षांना एकत्र येऊन भाजपला हरवण्याचं आवाहन केलं. यावेळी या कार्यक्रमात नितीश कुमार यांच्यासह उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, काँग्रेस नेता सलमान खुर्शीद, बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्याह भाकपा-मालेचे महासचिव कामरेड दीपांकर भट्टाचार्य हे देखील उपस्थित होते.


हेही वाचा : तालिबानींचा अत्याचार सुरूच; दोन महिलांसह ११ अफगाणींना मारहाण