घरताज्या घडामोडीCNG-PNG price hike : घरगुती गॅस सिलिंडरनंतर आता CNG आणि PNGच्या दरात...

CNG-PNG price hike : घरगुती गॅस सिलिंडरनंतर आता CNG आणि PNGच्या दरात वाढ, जाणून घ्या?

Subscribe

सीएनजी आणि पीएनजी किंमतीच्या दरात वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे. घरगुती गॅस वाटपातील कमतरता भरून काढण्यासाठी आता महानगर गॅस लिमिटेडने दराच्या किंमतीत बदल केले आहेत. देशांतर्गत सीएनजी आणि पीएनजी विभागांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा नॅचरल गॅसच्या किंमती वाढल्या आहे. परंतु देशांतर्गत सीएनजी आणि पीएनजीची गरज मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे महानगर गॅस लिमिटेड कंपनीने २६ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतलाय.

MGLने इनपूट गॅसच्या किंमतीत सुद्धा लक्षणीय वाढ केली आहे. गॅसच्या इनपूट खर्चातील वाढ भरून काढण्यासाठी MGLकंपनीने सीएनजीच्या मूळ किंमतीत बदल केली आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरात सीएनजीच्या दरात ३.६ रूपये प्रतिकिलो आणि घरगुती पीएनजीच्या दरात २.२६ रूपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे २७ नोव्हेंबरपासून सीएनजी आणि पीएनजी दरात बदलाव होताना पहायला मिळणार आहेत. PNG च्या दरात २७ नोव्हेंबरपासून एकच किंमत लागू होणार आहे.

- Advertisement -

CNG च्या सर्व करांसहित सुधारण वितरण किंमती या ६१.५० रूपये आणि देशांतर्गत आणि मुंबईत PNGचे दर ३६.५० रूपये होणार आहेत. सीएनजीकडून एक आकर्षित ऑफर देण्यात येत असून ६२ ते ३५ टक्क्यांची बचत ही मुंबईतील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीपेक्षा फरकाने कमी होणार आहे. तसेच घरगुती गॅसच्या किंमतीपेक्षा PNGची सेवा ग्राहकांसाठी अतुलनीय ठरणार आहे. कारण यामध्ये २७ टक्क्यांची बचत होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -