घरदेश-विदेशअपिलाच्या नावाखाली गोंधळ, ही काँग्रेस नेत्यांची नौटंकी, आव्हान याचिकेबाबत भाजपाची टिप्पणी

अपिलाच्या नावाखाली गोंधळ, ही काँग्रेस नेत्यांची नौटंकी, आव्हान याचिकेबाबत भाजपाची टिप्पणी

Subscribe

नवी दिल्ली : मोदी आडनाव प्रकरणी मानहानीच्या खटल्यात सुरत सत्र न्यायालयाने सुनावलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला काँग्रेस नेते राहुल गांधी आज आव्हान देणार आहेत. शिक्षेविरोधात सत्र न्यायालयात अपील दाखल करण्यासाठी राहुल गांधी आज सुरतला जाणार असून त्यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते जाणार असल्याचे बोलले जात आहे. यावरून भाजपने काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. अपीलाच्या नावाखाली गोंधळ ही काँग्रेसची नोटंकी असल्याचे संबित पात्रा म्हणाले आहेत.

आज राहुल गांधी शिक्षेविरोधात सत्र न्यायालयात अपील करण्यासाठी जाणार असून त्यांच्यासोबत काँग्रेस काही नेतेही जाणार आहेत. यावर भाजप नेते संबित पात्रा यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत सांगितले की, “राहुल गांधी, त्यांचे कुटुंबीय आणि अशोक गेहलोत, भूपेश बघेल असे काही मुख्यमंत्री आज सुरतला अपील करण्याच्या नावाखाली गोंधळ घालण्यासाठी जात आहेत. रस्ता अडवा, नोटंकी करा… या प्रकारामुळे गुजरातमध्ये काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या घराण्याचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहेत. पण मला हे समजत नाही की, गोंधळ घालण्याची काय गरज आहे.”

- Advertisement -

संबित पात्रा म्हणाले की, आम्हाला राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाला काही प्रश्न विचारायचे की, राहुल गांधी तुम्ही ओबीसी समाजाला शिवीगाळ केली आणि आज तुम्ही संपूर्ण थाटामाटात सुरतला जात आहात हे खरे नाही का? हा तुमचा न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा प्रयत्न नाही का? आज सुरतला जाऊन ओबीसी समाजाच्या जखमेवर मीठ चोळत नाहीत का? राहुलने कोर्टाला सांगितले की, मी राहुल आहे, मी माफी मागणार नाही. राहुल जी हा अहंकार कशाला? दोन आर कधीच एकत्र चालू शकत नाहीत… राहुल आणि जबाबदारी, असेही संबित पात्रा म्हणाले.

- Advertisement -

ओबीसी समाजाबद्दल लज्जास्पद टिप्पणी
राहुल गांधींनी ओबीसी समाजाबाबत लाजिरवाणे वक्तव्य करणे दुर्दैवी आहे. आता ते न्यायालयीन प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. प्रत्येकजण अपील करू शकतो, हा लोकशाही अधिकार आहे. पण त्यासाठी वकिलांच्या ‘फॅक्टरी’ची गरज नाही, असे संबित पात्रा यांनी सांगितले.

कायदा का बदलायचा?
संबित पात्रा म्हणाले की, पीव्ही नरसिंह राव यांच्यावर कारवाई झाली तर कोणताही गदारोळ नाही, पण राहुल गांधींवर कारवाई झाली तर कायदा का बदलायचा? डीके शिवकुमार यांच्यावर कारवाई झाली तेव्हा राहुल आणि प्रियंका गांधी यांनी कधीच पत्रकार परिषद घेतली नाही, मात्र गांधी कुटुंबाची चर्चा होताच सम्राट आणि राजकुमार यांच्यावर कारवाई कशी केली?, असे संबित पात्रा म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -