घरताज्या घडामोडीराहुल गांधींच्या चौकशीप्रकरणी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, ईडी कार्यालयाबाहेर जाळपोळ

राहुल गांधींच्या चौकशीप्रकरणी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, ईडी कार्यालयाबाहेर जाळपोळ

Subscribe

संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्लीतील ईडी कार्यालयाबाहेर टायर फोडून जोरदार आंदोलन केले. याप्रकरणी पोलिसांनी काँग्रेसच्या काही नेत्यांसह पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची नॅशनल हेराल्डप्रकरणी (National Herald) ईडीकडून (ED) चौकशी सुरू आहे. मंगळवारी दहा तास चौकशी केल्यानंतर आज पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. त्यामुळे संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्लीतील ईडी कार्यालयाबाहेर टायर फोडून जोरदार आंदोलन केले. याप्रकरणी पोलिसांनी काँग्रेसच्या काही नेत्यांसह पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. (Congress activists attack Rahul Gandhi’s interrogation, set fire outside ED office)

हेही वाचाराहुल गांधींवरील कारवाई हुकूमशाहीचे टोक, संजय राऊतांचा ईडी चौकशीवरुन भाजपवर निशाणा

- Advertisement -

नॅशनल हेराल्डप्रकरणी दोन हजार कोटींची अफराताफर केल्याचा आरोप करत गांधी कुटुंबियांना ईडीने नोटीस पाठवली होती. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी या दोघांनाही चौकशीला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. नोटीसीनुसार, १३ आणि १४ जून रोजी राहुल गांधी यांची चौकशी झाल्यानंतर आज पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत.


राहुल गांधी यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरू असतानाच बाहेर टायर पेटवण्यात आले. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर, काही काँग्रेस नेत्यांना घरातच कैद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राहुल गांधींची २ दिवसांत १८ तासांपेक्षा जास्त वेळ ईडीकडून चौकशी, तिसऱ्या दिवशी पुन्हा समन्स

काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार देपेंदर हुड्डा यांना पोलिसांनी घरातच कैद केलं आहे. याबाबतचा एक व्हिडीओ काँग्रेसच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. एका राज्यसभा खासदाराला अशाप्रकारे कैद करणं कोणत्या कायद्यात बसतं? काँग्रेस खासदारांना कैद करून भाजप सरकार आम्हाला घाबरवू शकत नाही. आज प्रत्येक कार्यकर्ता राहुल गांधींचा आवाज आहे, ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -