घरताज्या घडामोडीहिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस-भाजपामध्ये लढत; सध्याचे निकाल काय सांगतात?

हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस-भाजपामध्ये लढत; सध्याचे निकाल काय सांगतात?

Subscribe

हिमाचल प्रदेशसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण आज हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून, हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकींच्या निकालाचा कल हाती येत आहे.

हिमाचल प्रदेशसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण आज हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून, हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकींच्या निकालाचा कल हाती येत आहे. हाती आलेल्या कलानुसार, सध्या काँग्रेस आघाडीवर आहे. तसेच, भाजपा पिछाडीवर असून, इतर २ जागांवर पुढे आहे. (Congress BJP fight for Himachal Pradesh assembly Election 2022 What says current results)

गुजरातमध्ये सध्याचे निकाल पाहता भाजपा बहुमताच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. मात्र, हिमाचल प्रदेशच्या विधानसभेने देशभरात उत्सुकता वाढवली आहे. सध्याच्या निकालानुसार हिमाचल प्रदेशच्या ६८ जागांपैकी ३६ जागांवर काँग्रेसचे उमेदवार पुढे आहेत. तसेच भाजपाचे उमेदवार ३० जागांवर पुढे आहेत. इतर २ जागांवर पुढे असून भाजपाला हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे हिमाचलमध्ये भाजपा आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

दरम्यान, हिमाचल प्रदेशात पाच वर्षांनी सरकार बदलण्याची प्रथा आहे. 1985 पासून कोणत्याही पक्षाने सलग दोन विधानसभा निवडणुका जिंकलेल्या नाहीत. यावेळी या राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता कायम राहिली तर तो विक्रम ठरेल. सध्या सुरू असलेल्या मतमोजणीतून याचा निर्णय होणार आहे. राज्याच्या 14व्या विधानसभेच्या 68 जागांसाठी 12 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते.

राज्यभरात 59 ठिकाणी उभारण्यात आलेल्या 68 केंद्रांवर मतमोजणी सुरू आहे. या मतमोजणीसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 10,000 सुरक्षा कर्मचारी, निवडणूक अधिकारी आणि इतर सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या तसेच सीसीटीव्हीच्या निगराणीखाली मतमोजणी केली जाणार आहे. काही मतमोजणी केंद्रांबाहेर सुरक्षा दलांकडून ड्रोनचाही वापर करण्यात येणार आहे.

- Advertisement -

एक्झिट पोल काय सांगते?

हिमाचल प्रदेशच्या एक्झिट पोलनेही भाजपच्या विजयाचा अंदाज वर्तवला आहे. एबीपी न्यूज सी-व्होटरच्या एक्झिट पोलनुसार, हिमाचल प्रदेश निवडणुकीत भाजपला 33-41 जागा, काँग्रेसला 24-32 जागा, आपला शून्य आणि इतरांना 0-4 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. तर, आज तक-एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला 24-34 जागा मिळतील. काँग्रेसला 30-40 जागा मिळण्याचे संकेत आहेत. इतरांना 4-8 जागा मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आम आदमी पक्षाला एकाही जागेवर विजय मिळताना दिसत नाही. हिमाचलमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी एकूण 68 जागांपैकी 35 जागांची गरज आहे.


हेही वाचा – Himachal Election : दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याची प्रथा खंडित होईल का?

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -