घरराजकारणहिमाचल प्रदेश निवडणूकHimachal Election : दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याची प्रथा खंडित होईल का?

Himachal Election : दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याची प्रथा खंडित होईल का?

Subscribe

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशात पाच वर्षांनी सरकार बदलण्याची प्रथा आहे. 1985 पासून कोणत्याही पक्षाने सलग दोन विधानसभा निवडणुका जिंकलेल्या नाहीत. यावेळी या राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता कायम राहिली तर तो विक्रम ठरेल. गुरुवारी होणाऱ्या मतमोजणीतून याचा निर्णय होणार आहे. या निवडणुकीत खरी लढत भाजपा आणि काँग्रेसमध्ये होणार आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून निवडणूक रिंगणातील 412 उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.

राज्याच्या 14व्या विधानसभेच्या 68 जागांसाठी 12 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. आज, गुरुवारी सकाळी 8.00 वाजता राज्यभरात 59 ठिकाणी उभारण्यात आलेल्या 68 केंद्रांवर मतमोजणी सुरू होईल. या मतमोजणीसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 10,000 सुरक्षा कर्मचारी, निवडणूक अधिकारी आणि इतर सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या तसेच सीसीटीव्हीच्या निगराणीखाली मतमोजणी केली जाणार आहे. काही मतमोजणी केंद्रांबाहेर सुरक्षा दलांकडून ड्रोनचाही वापर करण्यात येणार आहे. सुरुवातीला पोस्टल मतपत्रिकांनी मतमोजणी सुरू होईल आणि त्यानंतर सकाळी 8.30 वाजता ईव्हीएमची मतमोजणी होईल.

- Advertisement -

7881 मतदान केंद्रांवर मतदान
गेल्या 12 नोव्हेंबर रोजी 7 हजार 881 मतदान केंद्रांवर मतदान झाले होते. भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी सर्व 68 जागांवर उमेदवार उभे केले, तर आम आदमी पक्षाने द्रांग विधानसभा मतदारसंघ वगळता उर्वरित 67 जागांवर उमेदवार उभे केले. डाव्या पक्षांनी 12 जागांवर निवडणूक लढवली. बसपा, देवभूमी पक्षासह अनेक पक्षांनीही उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. अपक्षांची संख्याही मोठी आहे. एकूण 412 उमेदवारांपैकी 388 पुरुष आणि 24 महिला आहेत.

एक्झिट पोल काय सांगते?
हिमाचल प्रदेशच्या एक्झिट पोलनेही भाजपच्या विजयाचा अंदाज वर्तवला आहे. एबीपी न्यूज सी-व्होटरच्या एक्झिट पोलनुसार, हिमाचल प्रदेश निवडणुकीत भाजपला 33-41 जागा, काँग्रेसला 24-32 जागा, आपला शून्य आणि इतरांना 0-4 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. तर, आज तक-एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला 24-34 जागा मिळतील. काँग्रेसला 30-40 जागा मिळण्याचे संकेत आहेत. इतरांना 4-8 जागा मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आम आदमी पक्षाला एकाही जागेवर विजय मिळताना दिसत नाही. हिमाचलमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी एकूण 68 जागांपैकी 35 जागांची गरज आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -