घरदेश-विदेशपेगॅसस हत्यार लोकशाही विरोधात का वापरलं? राहुल गांधी मोदी सरकारविरोधात आक्रमक

पेगॅसस हत्यार लोकशाही विरोधात का वापरलं? राहुल गांधी मोदी सरकारविरोधात आक्रमक

Subscribe

पेगॅससच्या मुद्द्यावर काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीसह १४ पक्ष एकवटले

पेगॅससच्या मुद्द्यावरुन काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारवर हल्लाबोल केला आहे. पेगॅससची खरेदी केली की नाही? पेगॅसस नावाचं हत्यार लोकशाही विरोधात का वापरलं? अशी प्रश्नांची बरसात केली आहे. पेगॅससच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी संसदेत सत्ताधारी भाजपला चांगलच घेरंल आहे. विरोधी पक्षांची आज बैठक पार पडली असून विरोधक आक्रमक झाले आहेत. या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह तब्बल १४ पक्षांचे नेते उपस्थित होते. बैठकीनंतर राहुल गांधी यांनी माध्यमांना संबोधित केलं.

संसदेत विरोधकांचा आवाज दाबला जात आहे, आमचा एकच प्रश्न आहे की मोदी सरकारने पेगॅसस विकत घेतलं आहे की नाही. सरकारने आपल्या लोकांवर पेगॅसस शस्त्र वापरलं की नाही? असे प्रश्न राहुल गांधी यांनी केले. माझ्या विरोधात, सुप्रीम कोर्ट, मीडिया आणि इतरांविरोधात पेगॅसस शस्त्र वापरलं. सरकारने हे का केलं, याचं उत्तर त्यांनी द्यावं. आम्ही संसदेचं कामकाज थांबवलं नाही, परंतु आम्ही आवाज उठवण्याचा प्रयत्न करीत आहोत, असं राहुल गांधी म्हणाले.

- Advertisement -

काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीसह १४ पक्ष एकवटले

पेगॅससच्या मुद्द्यावर १४ विरोधी पक्ष एकटवले आहेत. या पक्षांची आज बैठक पार पडली. दिल्लीत झालेल्या या बैठकीला काँग्रेस, डीएमके, राष्ट्रवादी, शिवसेना, राजद, सपा, सीपीआयएम, सीपीआय, नॅशनल कॉन्फरन्स, आम आदमी पार्टी, इंडियन युनियन मुस्लिम लीग, आरएसपी, केरळा काँग्रेस (एम) आणि व्हिसीके पार्टीचे नेते उपस्थित होते. या बैठकीला शिवसेनेकडून संजय राऊत उपस्थित होते. तर राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे उपस्थित होते. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पेगाससप्रकरणी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. सरकारला यावर उत्तर द्यावच लागेल, असा इशारा दिला.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -