घरCORONA UPDATERBI च्या चोरांच्या यादीत भाजपचे मित्र - राहुल गांधी

RBI च्या चोरांच्या यादीत भाजपचे मित्र – राहुल गांधी

Subscribe

काँग्रेसचे खासदार आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. केंद्र सरकारने मोठ्या बँक डिफॉल्टरची नावे लपविल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातल्या बड्या उद्योगपतींची हजारो कोटींची कर्ज माफ केली आहेत. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी संसदेत विचारलेल्या एका प्रश्नाचा पुन्हा उल्लेख केला आहे. ते म्हणाले की, “आरबीआयने नीरव मोदी, मेहुल चोक्सी सहीत भाजपच्या मित्रांची नावे आता बँक चोरांच्या यादीत टाकले आहेत.”

- Advertisement -

राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मी संसदेत साधा प्रश्न विचारला होता की, “मला देशातील ५० सर्वात मोठ्या बँक चोरांचे नाव सांगा. मात्र अर्थमंत्र्यांनी उत्तर देणे टाळले होते. आज आरबीआयने ती नावे उघड केली आहेत. यासाठीच संसदेत या नावांना लपविण्यात आले होते.” मार्च महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राहुल गांधी यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.

राहुल गांधी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकुर म्हणाले होते की, राहुल गांधी यांच्या प्रश्नावर लपविण्यासारखे काहीच नाही. बँकाच्या व्हिलफुल डिफॉल्टरची माहिती CIC च्या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. २५ लाखाहून अधिक कर्ज बुडविल्यांची माहिती वेबसाईटवर देण्यात येत असते.

- Advertisement -

काय आहे प्रकरण?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने माहिती अधिकारात आलेल्या अर्जाला उत्तर देताना सांगितले की, अनेक बँकांची कर्ज बुडवून परदेशी परागंदा झालेल्या मेहुल चोक्सी, नीरव मोदी, विजय माल्ल्यांसारख्या डिफॉल्टर उद्योगपतींचा देखील समावेश आहे. माफ करण्यात आलेल्या कर्जाची एकूण किंमत तब्बल ६८ हजार ६०७ कोटींच्या घरात आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले यांनी केलेल्या अर्जाच्या उत्तरातून थेट रिझर्व्ह बँकेकडूनच याची माहिती देण्यात आली आहे. साकेत गोखले यांनी ट्वीटरवर ही माहिती आणि या ५० जणांची यादीच जाहीर केली आहे. ३० सप्टेंबर २०१९पर्यंतची ही कर्जाची रक्कम आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -