घरदेश-विदेशराहुल गांधींचा कार्यकारिणीला राजीनामा सुपूर्द; पण...

राहुल गांधींचा कार्यकारिणीला राजीनामा सुपूर्द; पण…

Subscribe

दिल्लीत काँग्रेसची कार्यकारिणी बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सोपवला.

लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर आज, शनिवारी दिल्लीत काँग्रेसची कार्यकारिणी बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सोपवला. मात्र कार्यकारिणीतील सदस्यांनी त्यांचा हा राजीनामा स्विकारला नसल्याचे समजते. दिल्लीमध्ये काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीची बैठक होत असून या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, मनमोहन सिंग, प्रियंका गांधी- वढेरा आणि काँग्रेसचे अन्य नेते उपस्थित आहेत.

- Advertisement -

अशोक चव्हाणदेखील देणार राजीनामा?

लोकसभा निवडणुकीत ५४२ पैकी काँग्रेसला ५२ जागा मिळाल्या आहेत. राहुल गांधी यांनी वायनाडमधून दणदणीत विजय मिळवला असला तरी परंपरागत अमेठी मतदारसंघ त्यांना राखता आला नाही. या वेळी लोकसभा निवडणुकीत १९ राज्यांमध्ये काँग्रेसला खातेही उघडता आले नाही. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये काँग्रेसच्या पक्षसंघटनेची वाताहत झालेली आहे. सहा महिन्यांपूर्वी छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेसची सरकारे स्थापन झाली असली तरी मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये पक्षाला काठावर बहुमत मिळालेले आहे. उत्तर प्रदेशच्या २०१७ मध्ये विधानसभा निवडणुकीतही राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला पराभव पत्करावा लागला होता. पक्षाध्यक्ष या नात्याने राहुल यांचे नेतृत्व सतते अपयशी ठरत असल्याने पक्षासमोर संघटनात्मक पेच निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत राहुल गांधी यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवल्याचे समजते. महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे देखील राजीनामा देणार असल्याचे समजते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -