घरताज्या घडामोडीCOP26 : कोळशावर आधारित वीज प्रकल्पासाठी भारताला चीनसह विकसनशील देशांचा पाठिंबा, भारताचा...

COP26 : कोळशावर आधारित वीज प्रकल्पासाठी भारताला चीनसह विकसनशील देशांचा पाठिंबा, भारताचा फेज आऊटला विरोध

Subscribe

जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी आणि प्रदूषणावर तसेच पर्यावरणाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी स्कॉटलंडमधील ग्लास्गो येथे कॉप२६ परिषद घेण्यात आली होती. या परिषदेला २०० देशांची उपस्थिती होती. तापमानवाढ, जैविक इंधन, कोळसा, खनिज अशा विषयांवर चर्चा केली. या परिषदेत भारत, चीनने कोळशाच्या वापरावर फेज आऊट ऐवजी फेज डाऊन हा शब्द करण्याची मागणी केली. या कोळशाच्या भूमिकेवर भारत आणि चीनने स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी कॉप२६ चे अध्यक्ष अलोक शर्मा यांनी केली आहे. परिषदेत कोळशावर आधारित असलेल्या देशांना कोळशाचा कमी वापर करुन वीज निर्मिती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ग्लास्गो येथील परिषदेत संयुक्त राष्ट्र हवामानमध्ये पहिल्यांदाच जैविक इंधनामुळे होणाऱ्या नुकसानीबाबत चर्चा करण्यात आली आहे. कॉप२६ च्या परिषदेत भारतासह चीन आणि कोळशावर अवलंबून असलेल्या राष्ट्रांनी कोळशाचा वापराबाबत फेज आउट हे कलम नाकारून त्यात फेज डाऊन करावे अशी मागणी केली आहे. यामुळे कॉप२६ अध्यक्षांनी म्हटलं आहे की, भारत आणि चीनला त्यांच्या भूमिकेविषयी स्पष्टीकरण द्यावे लागेल. फेज आऊट मध्ये कोळशाचा कमी वापर करुन वीज निर्मिती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पंरतु भारताने हे कलम नाकारुन त्यात फेज डाऊन करण्याची भूमिका घेतली.

- Advertisement -

भारत,चीन आणि विकसनशील देशांनी फेज डाऊनची मागणी केल्यानंतर इतर देशांनीही नमती भूमिका घेत सूचना मान्य केली आहे. परंतु या भूमिकेमुळे भारतावर टीका करण्यात येत आहे.

ब्रिटेनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, माझ्यासारख्या इंग्रजी वक्त्याला फेज डाऊन फेज आऊट याबाबत फारसा फरक पडणार नाही. कॉप२६ ने कोळशावर आधारित गोष्टींचा वापर कमी करण्याचे आवाहन केलं आहे. ज्याला काही देशांनी पाठिंबासुद्धा दिला आहे.

- Advertisement -

परिषदेत नैसर्गिक वायू आणि कच्चे इंधन तेल अशा विषयांवर चर्चा न करता केवळ कोळशावर भर दिला जात असल्याची भारतासह इतर देशांची भूमिका होती. ज्या देशांमध्ये प्रदूषण वाढले आहे त्या देशांनी प्रदूषण कमी कऱण्यासाठी कोणती उपाययोजना केली आहे. तसेच सुधारित उद्दिष्टे २०२२ मध्ये जगासमोर मांडण्यास सांगितले आहेत.


हेही वाचा : चीनमध्ये पसरली Covid-19 नवी लाट; युनिव्हर्सिटी कॅम्पस सील करून १५०० विद्यार्थ्यांना केलं आयसोलेट


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -