घरताज्या घडामोडीआधी तुरुंगातील जेवण घ्या नंतर विचार करु, देशमुखांची घरच्या जेवणाची मागणी न्यायालयाने...

आधी तुरुंगातील जेवण घ्या नंतर विचार करु, देशमुखांची घरच्या जेवणाची मागणी न्यायालयाने फेटाळली

Subscribe

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडी कोठडी संपली असून त्यांना सोमवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनवाण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडीमध्ये घरचे जेवण देण्यासाठी देशमुखांकडून न्यायालयात मागणी केली होती. मात्र ही मागणी फेटाळली असून न्यायालयाने तुरुंगातील जेवण घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे न्यायालयाने अनिल देशमुखांना चांगलाच दणका दिला आहे. मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना १०० कोटी रुपये वसुली करण्याचे आदेश दिल्या प्रकरणी आणि गैरव्यवहार केल्यामुळे अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १ नोव्हेंबर रोजी ईडीने अटक केली आहे. देशमुख ईडीच्या चौकशीसाठी हजर राहिले होते यावेळी १२ तासांच्या चौकशीनंतर देशमुख यांना अटक करण्यात आली. ईडी कोठडीमध्ये देशमुखांना घरचे जेवण देण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र देशमुखांची ईडी कोठडी सोमवारी संपली असल्यामुळे न्यायालयाने त्यांना आता न्यायालयीन कोठडी दिली आहे.

- Advertisement -

अनिल देशमुखांना न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर त्यांच्या वकिलांनी न्यायालयात तब्येतीबाबत कारण सांगत त्यांना घरचे जेवण देण्याची परवानगी देण्याची मागणी केली. न्यायालयाने सुनावणीदरम्यान देशमुखांची मागणी फेटाळून लावली आहे. तसेच आधी तुरुंगातील जेवण घ्या, जर तुम्हाला योग्य नाही वाटलं तर विचार करु असे उत्तर न्यायालयाने दिलं आहे. न्यायालयाने मागणी फेटाळल्यामुळे आता देशमुख यांना पुढील काही दिवस तुरुंगातील जेवण घ्यावे लागणार आहे. मात्र त्यांना एक वेगळा बेड देण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचे आदेश दिल्याचे आरोप केले होते. या प्रकरणात मनी लाँड्रिंग झाल्याचा ठपका ठेवत ईडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली. ईडीने पाच वेळा समन्स बजावून देखील चौकशीला गैरहजर राहणारे अनिल देशमुख सोमवारी १ नोव्हेंबर रोजी ईडी कार्यालयात हजर झाले. त्यानंतर त्यांची तब्बल सडे बारा तास चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली.

- Advertisement -

हेही वाचा : लसीकरण पूर्ण झालेल्या प्रवाशांना क्वारंटाईन होण्याची गरज नाही, ‘या’ देशाने जारी केल्या नव्या गाईडलाईन्स


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -