घरताज्या घडामोडीदिलासादायक: भारतात कोरोनाचा समूह संसर्ग नाही

दिलासादायक: भारतात कोरोनाचा समूह संसर्ग नाही

Subscribe

देशात अजून सामुदायिक संसर्ग झाला नसल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (ICMR) सांगण्यात आले आहे.

देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मात्र, असे असताना एक दिलासादायक बाब समोर आली आहे. देशात अजून सामुदायिक संसर्ग झाला नसल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (ICMR) सांगण्यात आले आहे.

मुंबई, दिल्लीसह देशातील काही महत्त्वाच्या शहरांमध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. तसेच या शहरांमध्ये अचानक वाढ झाल्यामुळे देशात समूह संसर्ग सुरु झाला असल्याचे बोलले जात होते. यावर देशातील लोकसंख्येनुसार एक टक्क्यांहून कमी लोकांपर्यंत कोरोनाचा संसर्ग झाला असल्याने देशात कोरोनाचा समूह संसर्ग झाला असल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक बलराम भार्गव यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

संसर्गाचे प्रमाण १ टक्क्यांपेक्षा कमी

भारतात समूह संसर्ग अद्याप झालेला नाही. कारण शहरी भागात हे प्रमाण फक्त एक टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तर छोट्या जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण १ टक्क्यांहून कमी आहे. त्यामुळे देशातील लोकसंख्येनुसार एक टक्क्यांहून कमी लोकांपर्यंत कोरोनाचा संसर्ग झाला असल्याने देशात कोरोनाचा समूह संसर्ग झाला असल्याचे म्हणणे चुकीचे असल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक बलराम भार्गव यांनी म्हटले आहे.

जगभर थैमान घालणाऱ्या जीवघेणा कोरोना विषाणू थांबायचं नाव घेत नाही आहे. देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात १० हजार ९५६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३९६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या आता २ लाख ९७ हजार ५३५ वर पोहोचली आहे. ज्यामध्ये १ लाख ४१ हजार ८४२ रुग्ण अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर १ लाख ४७ हजार १९५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत ८ हजार ४९८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – देशभरात २४ तासांत १० हजार ९५६ नवे रुग्ण; ३९६ कोरोनाबाधितांचा मृत्यू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -