Corona Crisis: कोरोनाशी लढताना भारताने चीनचे ‘फिल्ड हॉस्पिटलचे’ मॉडेल वापरावे, अमेरिकेच्या मुख्य आरोग्य सल्लागारांची सूचना

भारताने फिल्ड हॉस्पिटल उभी करण्यासाठी लष्कराची मदत घ्यावी

Corona Crisis: India should use China's field hospital model to fight corona, US chief health adviser suggests Dr. Anthony Fauji
Corona Crisis: कोरोनाशी लढताना भारताने चीनचे 'फिल्ड हॉस्पिटलचे' मॉडेल वापरावे, अमेरिकेच्या मुख्य आरोग्य सल्लागारांची सूचना

भारतात कोरोनाची (Covid 19) परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत आहे. अपुऱ्या वैद्यकीय सेवेमुळे अनेकांचे जीव जात आहे. भारतातील अत्यंत बिकट होत चाललेल्या कोरोनाच्या परिस्थितीवर अमेरिकेचे मुख्य वैद्यकीय सल्लागार आणि संसर्ग रोग तज्ज्ञ डॉ. अँथोनी फाउजी (Dr. Anthony Fauji) यांनी भारताला काही सल्ले दिले आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे की, भारताने कोरोना साखळी तोडण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करावा त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु करावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारताने चीनचे ‘फिल्ड हॉस्पिटल मॉडेल’ वापरावे अशा सूचना दिल्या आहेत. भारताने फिल्ड हॉस्पिटल उभी करण्यासाठी लष्कराची मदत घ्यावी असेही ते म्हणाले.

चीनमध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेत मोठ्या प्रमाणात फिल्ड हॉस्पिटल उभारली गेली होती. या फिल्ड हॉस्पिटलमुळे जास्तीत जास्त लोक हॉस्पिटलमध्ये राहून उपचार घेऊ शकली. चीन प्रमाणे एक महत्त्वाचे पाऊल भारताने उचलावे असे फाउजी यांनी भारताला सांगितले आहे. त्याचप्रमाणे भारतात पुढील काळात मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले तर निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येईल असेही ते म्हणाले.

भारतातील अनेक हॉस्पिटल्समध्ये जागा कमी असल्याने रुग्णांना उपचार मिळत नाहीत. त्यामुळे त्यांना केवळ तात्पुरते उपचार मिळतात. तर काहींचा उपचारांभावी मृत्यू देखिल होत आहे. भारतातील या परिस्थितीत जर मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल्स असतील तर रुग्ण रुग्णालयात उपचार घेऊ शकतील. त्यासाठी भारताने लष्कराच्या मदतीने कोरोना महामारीच्या काळात फिल्ड हॉस्पिटल्स उभारण्याची गरज आहे. त्यामुळेच रुग्णांवर योग्य उपचार होतील,असे डॉ काउच यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.


हेही वाचा – कोरोनाकाळात ट्विटरवर मदत हवेय? भारतीयांना मदतीसाठी ट्विटरचा फॉरमॅट जाहीर