चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार! WHO ने मागवली रुग्णांची योग्य आकडेवारी

Corona Update | कोरोना संसर्ग, लसीकरण, उपचार याबाबत चीनी अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. चीनने सुरुवातीपासूनच कोरोनासंदर्भात परिपूर्ण माहिती दिलेली नाही. चीन संपूर्ण माहिती देत नाही तोवर कोरोनाचा समूळ नायनाट करणे कठीण आहे, असंही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे.

corona in china

जेनेवा – जगभरात कोरोना प्रसार (Corona Virus) वेगाने होत आहे. चीनमध्येही कोरोना संसर्गाचा विस्फोट झाला आहे. नियमित येणाऱ्या आकड्यांवरून चीनमधील परिस्थिती गंभीर होत चालली असल्याचं स्पष्ट होत आहे. दरम्यान, चीनमधील कोरोनाची योग्य आकडेवारी सादर करावी अशी तंबीच जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) चीनला दिली आहे. तसंच, देशात कोरोनासंदर्भातील सर्व माहिती देण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा – चीनसह ६ देशांतील प्रवाशांना आरटी-पीसीआर बंधनकारक

जागतिक आरोग्य संघटनेचे महानिर्देशक डॉ.टेड्रॉस एडनॉम यांनी म्हटलं की, माझ्या टीमने चीनच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली आहे. कोरोनासंदर्भात घडणारी प्रत्येक घडामोड चीनने जगासमोर ठेवावी, असं आम्ही चीनला सांगितलं आहे.

कोरोना संसर्ग, लसीकरण, उपचार याबाबत चीनी अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. चीनने सुरुवातीपासूनच कोरोनासंदर्भात परिपूर्ण माहिती दिलेली नाही. चीन संपूर्ण माहिती देत नाही तोवर कोरोनाचा समूळ नायनाट करणे कठीण आहे, असंही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे.

हेही वाचा ‘कोविन अ‍ॅप’वर नेजल व्हॅक्सिन उपलब्ध

WHO ने 3 जानेवारी रोजी SARS-CoV-2 व्हायरस उत्क्रांतीवरील तांत्रिक सल्लागार गटाच्या बैठकीत व्हायरल सिक्वेन्सिंगवर तपशीलवार डेटा सादर करण्यासाठी चीनी शास्त्रज्ञांना आमंत्रित केले आहे. सध्या चीनमध्ये असलेल्या ओमिक्रॉन प्रकाराच्या सध्याच्या वाढीमुळे लाखो चिनी लोकांना संसर्ग झाला आहे, ज्यामुळे जगभरात चिंता निर्माण झाली आहे.

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने शुक्रवारी सुधारित कोविड मार्गदर्शक तत्त्वांनुसार भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी त्यांच्या चेक-इन सिस्टममध्ये सुधारणा करण्याचे आदेश एअरलाइन्सना दिले आहेत. सुधारित कोविड मार्गदर्शक तत्त्वांनुसार, चीन आणि इतर पाच देशांमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी 1 जानेवारी (रविवार) पासून निगेटिव्ह कोविड चाचणी अहवाल अनिवार्य करण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चीन, सिंगापूर, हाँगकाँग, दक्षिण कोरिया, थायलंड आणि जपान या सहा उच्च जोखमीच्या देशांमधून येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांसाठी RT-PCR नकारात्मक चाचणी अहवाल अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा पाकिस्तानने विकायला काढली अमेरिकेतील दूतावासाची इमारत? बोली लावणाऱ्या तिघांत एक भारतीय!