घरताज्या घडामोडीLive Update : मुंबईत आज 1,312 नवे कोरोनाबाधित रुग्ण

Live Update : मुंबईत आज 1,312 नवे कोरोनाबाधित रुग्ण

Subscribe

मुंबईत आज 1,312 नवे कोरोनाबाधित रुग्ण

10 रुग्णांचा मृत्यू , बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 4,990 वर

- Advertisement -


मागासवर्ग आयोगाची बैठक संपली

- Advertisement -

अनिल देशमुखांना पीएमएलए कोर्टाकडून नोटीस

देशमुखांनी दाखल केलेल्या जामीन अर्जाबाबत नोटीस

4 फेब्रुवारी रोजी पीएमएलए कोर्टात होणार सुनावणी


कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांची नात सौंदर्या यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. चार महिन्यांपूर्वी आई झालेल्या सौंदर्या प्रसूतीपश्चात नैराश्याच्या गर्तेत होत्या.


भाजप आमदार नितेश राणेंच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे. सरकारी वकील प्रदीप घरत अनुपस्थित असल्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली.


भाजप आमदार नितेश राणे यांनी नियमित जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात हजर केला आहे. या अर्जावर आज दुपारी सुनावणी होणार आहे. सविस्तर वृत्त वाचा 


सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे ठाकरे सरकारला थप्पड – देवेंद्र फडणवीस


भाजप आमदार नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा कोर्टात शरद जाण्यासाठी दाखल झाले आहेत.


12 आमदारांच निलंबन सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णय बद्दल देवेंद्र फडणवीस हे १२ वाजता गोवा निवडणूक कार्यालयातून पत्रकारांशी संवाद साधतील, अशी माहिती केशव उपाध्ये यांनी दिली.


भाजप १२ आमदारांचं निलंबन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द


ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत राज्य मागासवर्ग आयोगाची आज बैठक होणार आहेत. आज या बैठकीत राज्य सरकारच्या आकडेवारीवर चर्चा होणार आहेत.


केरळमध्ये ९४ टक्के ओमिक्रॉनचे पॉझिटिव्हिटी नमुने सापडले, अशी माहिती आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली.


केंद्रीय मंत्री नारायण राणे सिंधुदुर्गात दाखल झाले असून आज पत्रकार परिषद घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


ठाण्यातील भिवंडी परिसरातील समरस चामुंडा कॉम्प्लेक्समधील फर्निचरच्या गोदामाला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अद्याप यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती भिवंडी अग्निशमन विभागाने दिली आहे.


केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांची आज दक्षिण राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत बैठक होणार. या बैठकीमध्ये कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला जाणार.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -