Corona : राज्यसभा खासदार अशोक गस्ती यांचे निधन

भाजप नेते अशोक गस्ती

राज्यसभेचे खासदार आणि कर्नाटक भाजप नेते अशोक गस्ती यांचे आज, गुरुवारी बेंगळुरू येथे कोरोनाने निधन झाले. त्यांचा कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना २ सप्टेंबर रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. कर्नाटक मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करणारे भाजप नेते अशोक गस्ती यांनी यावर्षी २२ जुलैला राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेतली होती. कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यात भाजप पक्ष आणि संघटना बळकटीचे कार्य गस्ती यांनी केले होते. वयाच्या १८ व्या वर्षी ते भाजपमध्ये दाखल झाले. यानंतर ते कर्नाटक भाजपच्या युवा मोर्चाचे अध्यक्षही होते.

 

हेही वाचा –

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या पायाभरणी