Tuesday, May 11, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Corona Update : WHO मार्फत भारतात मनुष्यबळ, साधनसामग्री पाठवण्याचा निर्णय

Corona Update : WHO मार्फत भारतात मनुष्यबळ, साधनसामग्री पाठवण्याचा निर्णय

who कडून भारताला ऑक्सिजन मशिन्स भारताला पुरवले जाणार

Related Story

- Advertisement -

देशभर कोरोनाने थैमान घातले आहे. देशातील रुग्णालयात गंभीर परिस्थिती आहे. ऑक्सिजन, बेड्सचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. भारताची ही चिंताजनक परिस्थिती पाहून  जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मदतीचा हात पुढे केला आहे.  भारतात मनुष्यबळ व आवश्यक साधनसामग्री पाठवण्याचा निर्णय WHOने घेतला आहे. डब्ल्यूएचओचे प्रमुख चीफ टेड्रोस अधनोम घेब्रेयेसस यांनी भारतातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.  भारतातील परिस्थिती दिवसेंदिवस खराब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारताची स्थिती अत्यंत नाजूक झाली आहे. भारताची सद्य परिस्थिती ही ह्रदयद्रावक असल्याचे डब्ल्यूएचओच्या प्रमुखांनी म्हटले आहे.

जगात कित्येक देश कोरोना महामारीचा सामना करत आहेत. मात्र भारत चारही बाजूंनी अडकला आहे. त्यामुळे WHO भारताताला कोरोना संकटाला समोरे जाण्यासाठी, कोरोना संकटात भारताला मदत करण्यासाठी WHO ने २६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या जवानांच्या मार्फत भारतातील कोरोना लसीकरण त्याचबरोबर विविध कामांसाठी त्यांची मदत होईल. ब्रिटन, जर्मनी आणि अमेरिकेनंतर WHO ने भारतालाही वैद्यकीय मदत करण्याचा निर्णय घेतला. who कडून भारताला ऑक्सिजन मशिन्स भारताला पुरवले जाणार आहेत.

- Advertisement -

भारतात कोरोनाची लाट दुसऱ्या लाटेपेक्षा सौम्य होती. पहिल्या लाटेतही भारताच्या आरोग्य यंत्रणेवर ताण आला होता. मात्र दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा तीव्र आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर आधीपेक्षा प्रचंड ताण निर्माण झाला आहे. देशात गेल्या २४ तासांत  ३ लाख २३ हजार १४४ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. २ हजार ७७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे. मोठ्या संख्येने रुग्ण उपचारांसाठी येत आहेत. मात्र ऑक्सिजन,बेड्सच्या कमरतेमुळे उपचाराभावी रुग्णांचा मृत्यू होत होत आहे.


हेही वाचा – Corona Update : दिलासादायक! देशात कोरोना रुग्णसंख्येत काही अंशी घट, तर २७७१ जणांचा मृत्यू

- Advertisement -