घरताज्या घडामोडीकोविड-१९ लसीच्या बास्केटमध्ये आता जॉनसन अँड जॉनसनची लस, केंद्राची आपातकालीन वापरासाठी मंजुरी

कोविड-१९ लसीच्या बास्केटमध्ये आता जॉनसन अँड जॉनसनची लस, केंद्राची आपातकालीन वापरासाठी मंजुरी

Subscribe

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वात महत्त्वाचं अस्त्र म्हणजे लस. त्यामुळे सध्या जगातील सर्व देशांचं संपूर्ण लोकसंख्येचं लसीकरण लवकरात लवकर व्हावे, असं लक्ष्य आहे. भारतात देखील लसीकरणावर अधिक भर देण्यात आला आहे. आता भारतातील कोरोनाच्या लढाईतील पाचवं अस्त्र सज्ज झालं आहे. आज, शनिवारी जॉनसन अँड जॉनसन कंपनीच्या कोरोना लसीला आपातकालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी स्वतः ट्विट करून माहिती दिली आहे.

याआधी देशात कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन, स्पुटनिक व्ही आणि मॉडर्ना या लसींना आपातकालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. पण आता जॉनसन अँड जॉनसनच्या लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी मिळल्यामुळे देशातील कोरोना लसीच्या बास्केटमध्ये ५ लसींचा समावेश झाला आहे.

- Advertisement -

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया ट्वीटमध्ये म्हणाले की, ‘भारताने लसीचे बास्केट वाढवले आहे. जॉनसन अँड जॉनसन लसीच्या सिंगल डोसला आपातकालीन वापरासाठी भारतात मंजुरी देण्यात आली आहे. आता देशात कोरोना विरोधातील लढाईत ५ लसी झाल्या आहेत. यामुळे आपल्या देशातील सामूहिक लढाईला आणखी पाठबळ मिळाले आहे.’

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी जॉनसन अँड जॉनसन कंपनीने देशातून लस मंजूरीचा प्रस्ताव मागे घेतला होता. याबाबत सोमवारी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने माहिती दिली होती. जॉनसन अँड जॉनसन कंपनीने लस मंजूरीचा प्रस्ताव मागे का घेतला? याबाबत अद्याप कारण दिले नाही आहे.


हेही वाचा – Corona Vaccination: लहान मुलांच्या लसीकरणासाठी पुढचं वर्ष उजाडणार!


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -