Tuesday, May 11, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Corona Vaccination : WHO ने दिली ‘मॉडर्ना’ लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी

Corona Vaccination : WHO ने दिली ‘मॉडर्ना’ लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी

आपत्कालीन परिस्थितीत औषधे आणि लस लवकरात लवकर उपलब्ध व्हावेत हा या निर्णयामागचा हेतू असल्याचे डब्ल्यूएचओकडून सांगण्यात आले. 

Related Story

- Advertisement -

भारतासह जगभरात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. बऱ्याच देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढताना दिसत आहे. त्यामुळे लसीकरण वाढवण्याचा सर्वच देशांचा प्रयत्न आहे. याच पार्श्वभूमीवर, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ‘मॉडर्ना’ कंपनीच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिली आहे. आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळालेली ही पाचवी लस असून यामुळे आता उत्पादन वेगाने वाढवण्यासाठी मदत होणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत औषधे आणि लस लवकरात लवकर उपलब्ध व्हावेत हा या निर्णयामागचा हेतू असल्याचे डब्ल्यूएचओकडून सांगण्यात आले.

इतर लसींचा उपलब्धता वाढवणे गरजेचे

भारतामध्ये कोरोनाची परिस्थिती गंभीर असून लसींचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे आता भारताने आपली कोव्हॅक्स या लसीची निर्यात थांबवली आहे. ही गोष्ट लक्षात घेता इतर लसींचा उपलब्धता वाढवणे गरजेचे असल्याचे डब्ल्यूएचओच्या सहाय्यक महासंचालक मारियानगेला सिमाओ यांनी स्पष्ट केले. त्यामुळेच ‘मॉडर्ना’ कंपनीच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी देण्यात आली आहे.

मॉडर्ना आपले उत्पादन वाढवणार

- Advertisement -

अमेरिकेतील मॉडर्ना औषधनिर्मिती कंपनीने ही लस विकसित केली आहे. ही लस कोरोनावर परिणामकारक असल्याचा दावा या कंपनीने केला होता. आपण विकसित केलेली कोरोना प्रतिबंधक लस ९४.१ टक्के परिणामकारक असल्याचे आणि लसीचे कोणतेही गंभीर दुष्परिणाम उद्भवले नसल्याचे मॉडर्ना कंपनीने याआधी जाहीर केले होते. आपण आपले उत्पादन वाढवणार असून २०२२ पर्यंत ३ अब्ज लसीचे डोस तयार करण्याची आपली योजना असल्याने मॉडर्ना कंपनीने याच आठवड्यात घोषित केले.

- Advertisement -