घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटकुत्र्यामार्फतही पसरु शकतो कोरोनाचा विषाणू

कुत्र्यामार्फतही पसरु शकतो कोरोनाचा विषाणू

Subscribe

भटक्या कुत्र्यांनी, विशेषत: त्यांच्या आतड्यांनी या साथीच्या उत्पत्तीमध्ये एक भूमिका निभावली आहे, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

जगभरात कोरोना विषाणूचा प्रसार कसा झाला? या प्रश्नाचे उत्तर अद्याप सापडलेलं नाही. जगभरातील शास्त्रज्ञ या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात व्यस्त आहेत. याबद्दल आता एक नवीन अभ्यास समोर आला आहे. शास्त्रज्ञ कोरोना विषाणूचा प्रसार कोणामार्फत झाला हे निश्चित करण्यासाठी विविध प्रजातींचा अभ्यास करत आहेत. शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की या महामारीच्या उत्पत्तीमध्ये भटक्या कुत्र्यांचा, विशेषत: त्यांच्या आतड्यांचा सहभाग आहे. जर हे संशोधन योग्य असेल तर परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. आण्विक जीवशास्त्र आणि उत्क्रांतीत (Molecular Biology and Evolution) प्रकाशित केलेल्या संशोधनानुसार, हा रोग नुकताच सापापासून पॅंगोलिनपर्यंत पोहोचला आहे. बर्‍याच प्रजातींमध्ये हा रोग आढळतो. कदाचित हे सर्व प्राणी सार्स कोविड-२ चा संसर्ग एकमेकांमध्ये पसरवला आहे. अशा प्रकारे तो वटवाघूळ आणि नंतर मानवापर्यंत पोहोचला. कॅनडामधील ओटावा विद्यापीठाचे शिहुआ शिआ यांच्या मते, या प्राण्यांकडून घेतलेले विषाणू सार्स कोविड-२ पेक्षा बरेच वेगळे आहेत. शिआने सांगितलं की, ‘सार्स कोविड-२ चा पूर्वज विषाणू आणि त्याचा जवळचा संबंधित विषाणू हा वटवाघळामध्ये आढळणारा एक विषाणू आहे.


हेही वाचा – एसीमुळे कोरोनाचा धोका वाढतो? जाणून घ्या एम्सच्या संचालकांचं मत

कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला वेढलं आहे. संसर्गामुळे मृतांची संख्या लाखांवर पोहोचली आहे. अमेरिका सध्या कोरोना विषाणूविरोधात सर्वाधिक संघर्ष करत आहे. जगभरातील वैज्ञानिक कोरोना विषाणू मानवांमध्ये कोणत्या प्रजातीतुन आला त्या प्रजातीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. संशोधकांचा असा दावा आहे की, या अभ्यासाच्या निकालांनी अधोरेखित केलं की कॅनिडे प्रजातीतील कोरोना विषाणूचे परीक्षण करणे आवश्यक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -