घरCORONA UPDATEचीनपेक्षा 'या' देशांमध्ये सर्वाधिक मृत्यू; जगभरातील मृत्यूचा आकडा ४२,१५१वर

चीनपेक्षा ‘या’ देशांमध्ये सर्वाधिक मृत्यू; जगभरातील मृत्यूचा आकडा ४२,१५१वर

Subscribe

चीनच्या वुहानपासून सुरू झालेल्या कोरोनाने संपूर्ण जगाला वेढले आहे. कोरोनामुळे आतापर्यंत जगात ४२ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना विषाणूचं थैमान अद्याप थांबण्याचं नाव घेत नाही आहे. जगातील सर्वच देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरु आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचे तंत्र सर्वच देशांनी अवलंबले आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार, जगभरात एकूण ८ लाख ५९ हजार ७९६ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर ४२ हजार ३४१ लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत गेल्या २४ तासांमध्ये कोरोनामुळे ९१२ लोकांचा बळी गेला. तर इटलीमध्ये एका दिवसात ८३७ लोकांनी प्राण गमावले. कोरोनाची सुरुवात चीनपासून झाली होती पण आता असे चार देश आहेत ज्यात चीनपेक्षा जास्त मृत्यूही झाले आहेत.


हेही वाचा – Coronavirus: पुतीन यांना भेटलेल्या डॉक्टरला कोरोनाची लागण

- Advertisement -

कोरोना विषाणूचा सर्वाधिक संसर्ग इटलीमध्ये दिसून येत आहे. वर्ल्डो मीटरनुसार, गेल्या २४ तासांत इटलीमध्ये ८३७ लोकांचा मृत्यू झाला असून इटलीमध्ये कोरोना विषाणूमुळे मृतांची संख्या १२ हजार ४२८ वर पोहचली आहे. जगात कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक मृत्यू इटलीमध्ये झाले आहेत. यासह, ४ हजार ५३ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे इटलीमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून १ लाख ५ हजार ७९२ झाली आहे.

स्पेनमध्ये आतापर्यंत ८ हजार ४६४ जणांचा मृत्यू

युरोपियन देश स्पेन कोरोनाचे नवे केंद्र बनले आहे. स्पेनमध्ये गेल्या २४ तासांमध्ये कोरोनामुळे ७४८ लोकांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये एकूण मृतांचा आकडा ८ हजार ४६४ वर पोहोचला आहे. स्पेनमध्ये मंगळवारी ७ हजार ९६७ नवे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे स्पेनमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा ९५ हजार ९२३ वर पोहोचला आहे.

- Advertisement -

कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झालेले देश

इटली – १२,४२८

स्पेन – ८,४६४

अमेरिका – ४,०५४

फ्रान्स – ३,५२३

चीन – ३,३०५

इराण – २,८९८

ब्रिटन – १,७८९

नेदरलँड – १,०३९

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -