घरCORONA UPDATEकोरोना व्हायरसमुळे चार वर्ष गायब असणारा मुलगा सापडला!

कोरोना व्हायरसमुळे चार वर्ष गायब असणारा मुलगा सापडला!

Subscribe

कोरोना व्हायरसमुळे देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असणाऱ्या मजूरांचे मात्र चांगलेच हाल झाले. अनेक मजूरांनी लॉकडाऊन जाहीर होताच गाव गाठलं. कोणी चालत निघालं तर कोणी मिळेल त्या वाहनाने गावी पोहचण्याचा प्रयत्न केला. पण या लॉकडाऊनच्या काळात गोपालपुर वासियांचा आनंद काही गगनात मावत नव्हता. कारण ४ वर्ष गायब असलेला रवी अचानक गावी आला होता. केवळ रवीचे कुटुंबीय नाहीतय तर संपूर्ण गावाला आनंद झाला होता. कारण संपूर्ण गावकऱ्यांना असच वाटत होतं की रवीबरोबर एखादा अपघात झाला आहे. रवी गावी पोहचताच सगळ्या गावकऱ्यांनी एकच जल्लोष केला. मात्र या आनंदात देखील गावकऱ्यांनी सामाजिक बान बाळगत रवीला आधी हॉस्पिटलमध्ये भरती केले आणि रविला प्राथमिक विद्यालयात क्वारंटाईन करण्यात आलं. रवी म्हणाला की जर कोरोना नसता तर मी कधीच गावी आलो नसतो.

गोपालपुरमधील निवासी बिजली यादव यांचे दोन मुलं आहेत. रवी आणि रामजी. चार वर्षापूर्वी घरगुती भांडणामुळे रवीने घर सोडलं. त्यानंतर त्याने घरतल्यांशी कधी संपर्क केला नाही. नातेवाईकांना हे ही समजत नव्हते की, रवी जिवंत आहे की काही अपघात वगैरे झाला. रवीला शोधण्याचा सगळ्यांनी खूप प्रयत्न केला. पोलिसातही तक्रार केली. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

- Advertisement -

रविवारी रात्री रवी गावी पोहचला तर सगळ्यानाच आश्चर्य वाटले. गावच्या संरपच नागेंद्र याजव यांनी रवीला खूप समजावले आणि प्राथमिक विद्यालयात क्वारंटाईन केले. जवळ उभ्या असलेल्या आईला बघून रवी रडायला लागला. रवीच्या आईच्या डोळ्यातूनही आनंद आश्रू वहात होते. रवीने गाववाल्यांना सांगतिले की, तो हरीयाणाला गेला होता. तीथेच कामाला सुरूवात केली. तो म्हणाला की जर कोरोना आला नसता तर तो कधीच गावी येऊ शकला नसता.


हे ही वाचा – हेअर कट बघून कोरोना पडणार संभ्रमात, हरभजनने शेअर केला मजेशीर फोटो!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -