घरCORONA UPDATEबापरे...!भारतात कोरोना घेतो दिवसाला ८ जणांचा जीव

बापरे…!भारतात कोरोना घेतो दिवसाला ८ जणांचा जीव

Subscribe

११ एप्रिल रोजी सकाळपर्यंत भारतातील कोविड-१९ प्रकरणांची नोंद दोन दिवसांत २८ टक्क्यांनी वाढून ६७६१ झाली होती.

भारतात ११ मार्च रोजी कर्नाटकात कोरोना विषाणूमुळे पहिल्या मृत्यूची नोंद झाली आणि ११ एप्रिल सायंकाळपर्यंत देशात ७,५०० हून अधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत आणि जवळपास २५० जण मृत्यूमुखी पडले आहेत. कोरोना विषाणूने जवळजवळ सर्वच राज्यांना विळख्यात घेतलं आहे. भारतात मृत्यूचं प्रमाण ८ टक्क्यांपर्यंत पोहोचलं आहे. पंजाबमध्ये, मृत्यूची संख्या देशाच्या सरासरीपेक्षा जवळपास तिप्पट आहे. भारतात ११ एप्रिल रोजी सकाळपर्यंतच्या आकडेवारीनुसार मृत्यूचे प्रमाण ३.२१ टक्के आहे. पंजाबमध्ये हे प्रमाण ८.३३ टक्के आहे, तर मध्य प्रदेशमध्ये ७.५९ टक्के आहे. दिल्लीत ते १.४४ टक्के आहे. पंजाबने ३,४६१ चाचण्या केल्या आणि ८.३३ टक्के मृत्यूची नोंद झाली. मध्य प्रदेशात ७,०४९ चाचण्या घेण्यात आल्या आणि ३३ मृत्यूची नोंद झाली. दुसरीकडे, दिल्लीत १० एप्रिलपर्यंत ११,०६१ चाचण्या घेण्यात आल्या. दिल्लीचा मृत्यू दर १.४४ टक्के आहे. भारतातील सर्वाधिक प्रभावित राज्य असलेल्या महाराष्ट्रात मृत्यूचे प्रमाण ७ टक्के नोंदले गेले. शनिवारी सकाळपर्यंत महाराष्ट्राने ३०,००० हून अधिक चाचण्या घेतल्या आणि १,५७४ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. तामिळनाडूने ८,४१० चाचण्या घेतल्या आणि ९११ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. तर ८ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेश, भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या प्रदेशात ९,३३२ चाचण्या घेण्यात आल्या आणि ११ एप्रिल रोजी सकाळपर्यंत एकूण ४३१ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. उत्तर प्रदेशमध्ये मृत्यू दर १ टक्के आहे. केरळमध्ये १३,००० पेक्षा जास्त चाचण्या घेण्यात आल्या. केरळमध्ये मृत्यू दर अर्धा टक्के आहे.


हेही वाचा – नागरिकांनी सहकार्य केलं तर लॉकडाऊन वाढवावं लागणार नाही- अजित पवार

रूग्णांच्या बाबतीत, केरळ आणि हिमाचल प्रदेशनंतर छत्तीसगडमध्ये इतर कोणत्याही राज्यापेक्षा चांगली कामगिरी आहे. छत्तीसगडमधील निम्मे कोविड -१९ रुग्ण बरे झाले आहेत. केरळमध्ये ही संख्या एक तृतीयांश आहे. महाराष्ट्र व गुजरातमध्ये रुग्ण बरे होण्याचा दर अनुक्रमे १२ आणि १० टक्के आहे. मध्य प्रदेश, बिहार, आसाम, झारखंड आणि त्रिपुरासारख्या राज्यांमध्ये आतापर्यंत एकही रुग्ण बरा झालेला नाही. ११ एप्रिल रोजी सकाळपर्यंत भारतातील कोविड-१९ प्रकरणांची नोंद दोन दिवसांत २८ टक्क्यांनी वाढून ६७६१ झाली होती. महाराष्ट्र, दिल्ली आणि तामिळनाडूमध्ये गेल्या काही दिवसांत सर्वाधिक घटना घडल्या आहेत. या राज्यात निम्म्याहून अधिक नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. मृतांची संख्याही वेगाने वाढत आहे. ३० दिवसात भारतात आतापर्यंत २८८ मृत्यूची नोंद झाली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -