राज्याला दिलासा! मृत्यूदर घसरला, कोरोनाच्या नव्या बाधितांमध्येही घट

corona

गेल्या काही दिवसांपासून नियमित दोन हजारांवर नव्या कोरोना रुग्णांची वाढ होत होती. मात्र, आता ही संख्या आज १ हजार १११ पर्यंत पोहोचली आहे. तर, आज दिवसभरात १ हजार ४७४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी मुंबईत सर्वाधिक रुग्ण आहेत. मुंबईत १७६ नवे रुग्ण आढळले असले तरीही गेल्या काही दिवसांमधील ही कमी आकडेवारी आहे. (Corona Update from Maharashtra)

राज्यातील मृत्यूदर वाढला होता. मात्र, आज एकाही कोरोनाबाधित मृत्यूची नोंद न झाल्याने महाराष्ट्राला दिलासा मिळाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर आता १.८४ टक्के झाला आहे. सध्या राज्यात १५ हजार १६२ रुग्णांवर उपचार सुरू असून यापैकी २ हजार २३२ रुग्ण मुंबईतील आहेत. तर, १२०८ रुग्णांवर ठाण्यात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, राज्यात आतापर्यंत ७८ लाख ५७ हजार ३१४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७.९७ टक्के झालं आहे.

एकीकडे कोरोनाचा उद्रेक कमी होत असताना बीए ५ व्हेरियंटने डोकेदुखी वाढवली आहे. आज राज्यात बीए ५ व्हेरियंटचे २६ रुग्ण सापडले असून बी.ए. २.७५ ते १३ रुग्ण आढळले आहेत.

केरळमध्ये मंकीपॉक्सचा आणखी एक रुग्ण

केरळमध्ये मंकीपॉक्सचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी केरळमध्ये मंकीपॉक्सचा एक रुग्ण आढळला होता. आता काही दिवासांतच आणखी एक मंकीपॉक्सचे प्रकरण समोर आले आहे. राज्याच्या आरोग्य मंत्री वीना जॉर्ज यांनी ही माहिती दिली आहे.