घरताज्या घडामोडीCoronavirus: 'या' बोटाची लांबी दर्शवते कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका!

Coronavirus: ‘या’ बोटाची लांबी दर्शवते कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका!

Subscribe

या अभ्यासाकरिता संशोधकांनी ४१ देशांमधील रुग्णांच्या डेटाचे विश्लेषण केले आहे. यामध्ये २ हजार २७४ भारतीय पुरुषांचा समावेश आहे.

संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा ५६ हजारांहून अधिक झाला आहे. तर ३ लाख ५२ हजारांहून अधिक जणांना मृत्यू झाला आहे. या कोरोना व्हायरस रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लस आणि औषधासाठी संशोधन सुरू आहे. यादरम्यान अनेक संशोधकांच्या अभ्यासातून कोरोनासंदर्भात आश्चर्यचकीत करणाऱ्या गोष्टी समोर येत आहेत. आता काही संशोधकांनी केलेल्या अभ्यासानंतर असा दावा केला आहे की, पुरुषांच्या हातामधील एका बोटाचा संबंध कोरोना व्हायरसच्या धोक्याशी संबंधित आहे. या बोटाच्या आकारावर कोरोना व्हायरसचा धोका कमी की जास्त आहे हे सांगू शकते, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

हाताच्या बोटाचा संबंध कोरोना व्हायरसच्या धोक्याशी जोडला आहे आणि त्यामागचे कारण विज्ञान आहे. वैज्ञानिकांनी यासाठी त्यांनी ४१ देशांमधील रुग्णांच्या डेटाचे विश्लेषण केले. यामध्ये भारतातील २ हजार २७४ पुरुष कोरोना रुग्णांचा समावेश होता.

- Advertisement -

संशोधकांनी असे म्हटले आहे की, ज्या पुरुषांचे अनामिका बोट म्हणजे अंगठी घालणारे बोट लांब आहे, त्यांना कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका कमी असतो. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे असतात.

हा अभ्यास ब्रिटेनच्या वेल्समधील स्वनासी विद्यापिठात करण्यात आला आहे. १९२० मध्ये स्थापन झालेल्या हे विद्यापिठ पब्लिक रिसर्चसाठी प्रसिद्ध आहे. ‘अर्ली ह्यूमन डेव्हलपमेंट’ या जर्नलमध्ये हा अभ्यास प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अभ्यासात स्त्रियांच्या हाताच्या बोटांचा संबंध कोरोना व्हायरसच्या मृत्यूशी आढळला नाही आहे.

- Advertisement -

द सनच्या वृत्तानुसार, प्रोफेसर जॉन मॅनिंग म्हणाले की, अभ्यासाच्या आधारे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ऑस्ट्रिया आणि पूर्व आशियामधील देशांना जैविक फायदा होऊ शकेल. या देशांच्या लोकांची अनामिका बोट सहसा लांब असते. तसेच अनामिकाची लांबी गर्भधारणेदरम्यान गर्भास प्राप्त झालेल्या टेस्टोस्टेरॉनच्या पातळीशी संबंधित असते. या अभ्यासाठी वैज्ञानिकांनी ४१ देशांतील २ लाख लोकांचा डेटाचे विश्लेषण केले. या लोकांच्या बोटाचे माप संशोधकांनी घेतले होते. अभ्यासादरम्यान संशोधकांना असे आढळले की, ज्या देशात सरासरी अनमिका बोट लहान आहे, तेथे पुरुषांच्या कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे.


हेही वाचा – ट्विटरने पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प यांना सांगितले ‘फॅक्ट-चेक’ करायला


 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -