घरताज्या घडामोडीठाणे कारागृहात कोरोनाचा शिरकाव; चार कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण!

ठाणे कारागृहात कोरोनाचा शिरकाव; चार कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण!

Subscribe

ठाणे आरटीओमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समोर येत आहे. यामुळे आरटीओमधील एका कर्मचाऱ्यासह त्याचा पत्नीचा मृत्यू झाला आहे.

ठाणे शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आता ठाणे कारागृहातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. ठाणे कारागृहात चार कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे कारागृहात खळबळ माजली आहे. यापूर्वी एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती.

- Advertisement -

ठाणे कारागृहातील या चारही कर्मचाऱ्यांवर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यावेळी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. मग त्याचा अहवाला कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आता त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची चौकशी केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार १२ जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. एकूण सात जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी चार जणांचे कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला. एका महिन्यापूर्वा एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर मात्र परिस्थिती नियंत्रणात आली होती. पण रविवारी चार कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

ठाण्यात दुसरीकडे ठाणे प्रादेशिक परिवहन विभागात देखील कोरोनाचा शिरकाव झाला असून यामुळे एका कर्मचाऱ्यासह पत्नीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे हा कर्मचारी कामावर आलेल्या दिवसात त्याच्या संपर्कात आलेल्या इतर कर्मचारी अधिकारी आणि लोकांचा शोध घेतला जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पुण्यात कोरोना रूग्ण संख्या वेगाने वाढतेय, धक्कादायक आकडेवारी आली समोर!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -