घरट्रेंडिंगवाराणसी: देवामुळेही होऊ शकतो करोना!

वाराणसी: देवामुळेही होऊ शकतो करोना!

Subscribe

चीन मधून आलेला करोना व्हायरस सध्या जगभर थैमान घालत आहे. चीन मध्ये मृतांची आकडेवारी शिगेला पोहचली आहे. भारतातही ६० पेक्षा अधिक संशयित रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. शासनाने ही करोनापासून बचावासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मोहीमा राबवल्या आहेत. बहुतांश नागरिक तोंडाला मास्क लावून फिरत आहेत. सतत येणाऱ्या बातम्यांमुळे लोकांनी करोनाबद्दल अनेक अफवा ही पसरवल्या आहेत. त्यामुळे सामान्य लोकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. तसंच यामुळे अंधश्रद्धांनीही खत पाणी मिळत आहे. असाच एक प्रकार वाराणसी येथे समोर आला आहे. वाराणसीच्या प्रल्हादेश्वराच्या शिवमंदिरात भक्तांनी चक्क शिवलिंगालाच मास्क घातला आहे. तसेच मंदिरात येणाऱ्या भाविकांना शिवलिंगास हात लावण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. याता अर्थ आता देवाला ही करोनाला होणार का?

- Advertisement -

याचे कारण विचारल्यास, सध्या जगभरात करोना व्हायरसचा शिरकाव झाला आहे. महाशिवरात्री निमित्त शिवमंदिरात अनेक भाविक गर्दी करत असतात. शिवलिंगाला हात लावून त्याची पुजा केली जाते. यामुळे मोठ्या प्रमाणात जंतु संसर्ग होण्याचा धोका असतो. असं असलं तरी तिथल्या लोकांनी थेट शिवलिंगालाच मास्क घालून टाकला आहे.

तिथे वावरणारा प्रत्येक माणूस तोंडाला मास्क लावून फिरत आहे. या मंदिराचे फोटो एका वृत्तसंस्थेने प्रसारित केले आहेत. सध्या हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. यावर अनेक जोक ही पाहायला मिळत आहेत. तसेच अनेक हास्यास्पद कमेंट ही पाहायला मिळत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – करोना अपडेट – करोनाग्रस्तांना मिळणार आता विम्याचे कवच!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -